आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगांचे दाट अाच्छादन, पावसाची केवळ भुरभुर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बुधवारी दिवसभर आकाशात दाट ढगांचे अाच्छादन होते. अधूनमधून पाऊसही पडला. मात्र, जोरदार पावसापेक्षा भुरभुरच अधिक होती. सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आठ तासांत केवळ ०.८ मिमी पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. आदल्या दिवशी मात्र औरंगाबाद मंडळात १२, उस्मानपुरा १३, भावसिंगपुरा १०, चित्तेपिंपळगाव ७, चौका ३०, लाडसावंगी २०, करमाड २८, कांचनवाडी १०, चिकलठाणा मंडळात १५ मिमी, तर जिल्ह्यात १२.१६ मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. काही मोजक्याच मंडळांत चांगला पाऊस झाला. बहुतांश मंडळांत पेरणीयोग्य पाऊसही झालेला नाही. तरीही पाऊस येणारच या आशेवर शेतकरी पेरणी पूर्ण करून घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...