औरंगाबाद - एक महिन्याच्या दीर्घ विश्रांतीनंतर प्रसन्न झालेल्या वरुणराजाने मराठवाड्यातील १४ तालुक्यांत धो-धो बरसात करून आजपर्यंतच्या वार्षिक सरासरीची बरोबरी अवघ्या दोन दिवसांत केली. दोन दिवसांपासून मराठवाड्यात मुक्कामाला असलेला पाऊस पोळ्याला भोळा झाला. दरम्यान, या पावसाने पिण्याच्या पाण्याची टंचाई काही प्रमाणात दूर झाली आहे.
६३ मंडळांत झाली अतिवृष्टी : मराठवाड्यात ६३ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या ६५ पैकी१४, जालना ४९ पैकी २४, परभणी ३९ पैकी ०७, हिंगोली ३० पैकी ०३, नांदेड ८० पैकी ५, बीड ६३ पैकी ७ आणि उस्मानाबाद ४२ पैकी ३ मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
जायकवाडीत दोन दिवसांत ८% वाढ: जायकवाडी धरणाच्या पाणी साठ्यात दोन दिवसातच ८ टक्के वाढ झाली आहे. जायकवाडीचा पाणीसाठा आता ५७.४१ टक्क्यांवर गेला आहे.
पावसाचा जोर ओसरणार : पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, दि. २२ ते २५ आॅगस्ट या काळात मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अग्नेय विदर्भ व लगतच्या भागावर असणारे ठळक कमी दाबाचे क्षेत्र अाता विरळ होऊन नैऋत्य मध्य प्रदेश व लगतच्या भागावर सरकले आहे.
पुढील स्लाइडवरवर जाणुन घ्या...जालना, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, लातूरमधील परिस्थिती...