आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत अतिवृष्टीची नोंद; रात्री साडेअकरा वाजेपर्यंत 69 मिलिमीटर पाऊस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आठ दिवसांनंतर अौरंगाबादेत रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावत अतिवृष्टीची नोंद केली. रविवारी संध्याकाळी सहा वाजेनंतरच्या ५ तासांत रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ६९ मिलिमीटर पाऊस झाला. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत केवळ ३.७ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र सहानंतर पावसाचा जोर वाढला. पुढील पाच तास तो कायम होता. संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत ४६.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. रात्री उशिरापर्यंत एकूण ७२.७ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेच्या वतीने देण्यात आली. सोमवारीही पावसाची शक्यता आहे.

वरील धरणांतून विसर्ग, जायकवाडीत ६५% साठा
नाशिक जिल्ह्यातील धरणे ८०% भरली आहेत. रविवारी सायंकाळी ६.३० वाजता दारणातून २७०० क्युसेक, गंगापूर धरण १५६०, नांदूर-मधमेश्वर धरण ८७३१, वालदेवी धरणातून २४१ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी धरणाची पाणीपातळी ६५ टक्क्यांवर पोहोचली आहे.
बातम्या आणखी आहेत...