आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वाधिक पाऊस औरंगपुरा भागात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहराला सोमवारी (दोन डिसेंबर) रात्री दहा वाजेनंतर जोरदार पावसाने झोडपून काढले. विजेचा कडकडाट, वादळी वार्‍यासह दीड तास कोसळलेल्या सरींमुळे नाले ओसंडून वाहिले.
महसूल कार्यालयात झालेल्या नोंदीनुसार काल औरंगपुरा भागात सर्वाधिक म्हणजे 77 मिलिमीटर पाऊस झाला. कांचनवाडी भाग मात्र कोरडाठाक होता. उर्वरित भागांची नोंद अशी : उस्मानपुरा - 40 मिलिमीटर, भावसिंगपुरा - 24 मिलिमीटर, हर्सूल - 57 मिलिमीटर, चिकलठाणा - 49 मिलिमीटर, चितेगाव - 13 मिलिमीटर, चौका - 30 मिलिमीटर, लाडसावंगी - 25 मिलिमीटर, करमाड - चार मिलिमीटर