आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाणादाण - जोरदार सरींनी नववर्षाचे स्वागत ; बाजार समितीत मका भिजला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नववर्षाचे पहिल्याच दिवशी जोरदार सरींनी स्वागत झाले. दिवसभर ऊन -सावलीचा खेळ सुरू होता. दुपारी वाजेच्या सुमारास शहर परिसर त्यानंतर ५.१० ते ५.४५ वाजेपर्यंत शहरात मुसळधार पाऊस पडला.
अचानक आलेल्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली. हर्सूल, जटवाडा रोड, गारखेडा, चिकलठाणा, सिडको-हडको आदी भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.
उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याची स्थिती कमकुवत झाली. मध्य भारतात कमी हवेच्या दाबाचा प्रभाव वाढला आहे. यामुळे मंगळवारी मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. बुधवार, ३१ डिसेंबरलाही तुरळक ठिकाणी पाऊस पडला. गुरुवार, जानेवारीला बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. अवघ्या अर्ध्या तासात २४ मिमी पाऊस पडल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने केली आहे. गतवर्षीही २३ जानेवारीला ९.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. मात्र ५.२ मिमी पावसाची नोंद झाली.

रब्बी पिकांना पोषक
^हवामानात बदल होऊन पडत असलेल्या पावसामुळे आंबा मोहराची गळ होईल. ज्या बागायतदारांनी मृग बहार घेतला आहे त्या फळबागांसाठी, डाळिंबाचा हस्त बहार घेतलेल्यांसाठी आणि रब्बीतील पिकांसाठी हा पाऊस पोषक आहे. काढणीस आलेल्या कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे. आचार्यडॉ. संजय पाटील, कृषीशास्त्रज्ञ.

आणखी पाऊस
^पुढील ४८ ते ७२ तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाकिस्तान-अरबस्तानावर थंड वारे वाहत आहेत. त्याचा प्रभाव आपल्याकडे वाढल्यास येणाऱ्या काळात गारपीट होण्याची शक्यता आहे. श्रीनिवासऔंधकर, संचालक,खगोलशास्त्र
किमान तापमानात ९.५ अंशांनी वाढ
२८ डिसेंबर रोजी किमान तापमानाने प्रथमच ७.८ अंश सेल्सियस नीचांक गाठला होता. मात्र, थंड आणि गरम वाऱ्याचा संगम होऊन वातावरण बदलले.दोन दिवसांपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. यामुळे किमान तापमानात ९.७ अंशांनी वाढ होऊन ते १७.१ अंश सेल्सियसवर पोहोचले.