आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात १९ ठिकाणी अतिवृष्टी; जालना, उस्मानाबादमध्ये पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात मंगळवारी १९ मंडळांत अतिवृष्टी झाली. यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील नरसी गावात १२८ मिमी पावसाची नोंद झाली. जालना, हिंगोली, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. बुधवारीही या भागात रिमझिम सुरू होती. या पावसामुळे अतिवृष्टी झालेल्या भागात चाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे.

नर्सी नामदेवमध्ये १२८ मिमी पाऊस झाला. जालनामधील जामखेडला ६६, रांजणी ७९, हिंगोलीमधल्या पानकनेरगाव १०६, खंबाळा १०८, साखरा ७७, माळहिवरा ८०. सि. बुद्रुक ८०, हट्टा ६९, बासंबा १०४, कळमनुरी ७७, बाळापूर ७१, नांदेडमध्ये देहली ७४, माहूर ८२, वानोळा ७५, वाई ८७, उस्मानाबादमध्ये बेंबळी ८५, मुळज ११०, उमरगा ७०, तर औरंगाबादच्या करंजखेड्यात ६० तसेच तीर्थपुरी ६४, रोहिलागड ६०, परतूर ५९, दासखेड ५३, मोगाळी ५०, मातुळ ५०, मनाठा ५६, तळणी ५१, हिंगोली ५३, डोंगरकडा ६४, वारंगाफाटा ६३, सेनगाव ५७, अाजेगाव ५०, मदनसुरी ५३, कासारशिरसी ६४, औसा ५५, माकणी ५५, मुरुम येथे ५१ मिमी पाऊस झाला.

सर्वाधिक पाऊस हिंगोली जिल्ह्यात
मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस हिंगोली जिल्ह्यात झाला. हिंगोली तालुक्यात ८६ मिमी, कळमनुरीत ५६, सेनगाव ६५, वसमत १९, आणि औंढा नागनाथ तालुक्यात ३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरग्यामध्ये ६०, लोहारा ३८, तर लातूर जिल्ह्यातील उमरग्यामध्ये ३५, औशामध्ये ३०, बीड जिल्ह्यातल्या पाटोदा येथे २९, वडवणीत २८, नांदेडमधील माहूरमध्ये ७१, हदगाव २९, किनवट ३१,भोकर ४४, उमरी ३६ , तर जालना जिल्ह्यातील अंबड (४४) घनसावंगी (३४)आणि औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्रीत (३४) मिमी पावसाची नोंद झाली.

औरंगाबादेत पावसाची हजेरी...
दुष्काळी पथकाने ज्या जिल्ह्यांत मंगळवारी पाहणी केली त्या सर्व म्हणजे औरंगाबाद, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री येथे ३४, कन्नड ३४, सिल्लोड २०, औरंगाबाद ११, पैठण ०८, सोयगाव ०६, खुलताबाद तालुक्यात १० मिमीची नोंद झाली.

पुढील स्लाइडमध्ये, चिखलामुळे बस नाल्यात पडली