आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: गोदावरीच्या पुराने नाशिककरांच्या उरात भरली पुन्हा धडकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकच्या अहिल्या देवी होळकर पुलाखालून गोदावरी अशी वाहत आहे. - Divya Marathi
नाशिकच्या अहिल्या देवी होळकर पुलाखालून गोदावरी अशी वाहत आहे.
नाशिक : चार दिवसांपूर्वी गोदावरीला आलेल्या महापुरामुळे गोदाकाठावरील अनेक कुटुंबांना बेघर व्हावे लागले असताना शनिवारी आलेल्या पुराने नाशिकच्या पंचवटी येथील नागरिकांना पुन्हा बेघर व्हावे लागले. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात येत असला तरी त्यांच्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आजही महापुराच्या भीतीचे भाव जाणवत होते.

गोदावरीला आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका पंचवटी परिसरातील नागरीकांना बसला. महापुरानंतर सर्वत्र चिखल साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. घरातील सर्व वस्तू पाण्यात वाहून गेल्या आहेत. बुधवारी गोदावरीच्या पूर कमी झाल्यानंतर स्थलांतरीत झालेले नागरिक आपल्या ओस पडलेल्या घराकडे वळाले. मात्र, शुक्रवारी रात्रीपासून पुन्हा पाऊस सुरु झाला. धरणक्षेत्रात संततधार सुरु असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरीला सकाळी पुर आला. प्राचिन पुर मापक असलेल्या दुतोंड्या मारुती बुडाल्याने बालाजी कोटाला पाणी लागले. रामसेतू पुल पाण्याखाली गेला. गाडगेमहाराज रामवाडी पुलावरून पाणी वाहण्याची शक्यता असल्याने दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. गोदाकाठवरील नागरिकांना पोलिस प्रशासनाकडून सूचना आणि सतर्कतेचा इशारा देण्यात येत होता.

पोलिस यंत्रणा सज्ज : प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आल्यानंतर नागरीकांशी थेट संपर्क साधून पोलिसांनी त्यांचे स्थलांतर केले. पोलिस यंत्रणेकडून पूर परिस्थितीची माहिती घेण्यात येत आहे.
आठवडाभरातील पावसाची स्‍थिती..
मंगळवारी राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे बहुतेक धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. नगर आणि नाशिक जिल्ह्यात झालेल्या विक्रमी पावसाने गोदावरीला महापूर आला आहे. नाशिक शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नगर जिल्ह्यातील रतनवाडी येथे २४ तासांत ४८१ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली. विदर्भातही पावसाने जोरदार हजेरी लावली. अकोला शहरासह बुलडाणा, वाशीम आणि अमरावती जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. प. महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली , सोलापूर जिल्ह्यातही पाऊस झाला. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी जिल्हे वगळता इतरत्र पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसून आले. खान्देशात दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने मंगळवारी विश्रांती घेतली. दरम्यान, कोयना, वारणा धरणांच्या पातळीत वाढ झाली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, गोदावरीला आलेला पूर.... अहिल्या देवी होळकर आणि आसाराम पुलाची छायाचित्रे.... चौथ्या स्लाईडव बघा व्हिडिओ....
मंगळवारी आलेल्‍या पुरामुळे गोदापात्रातील मंदिरे गेली पाण्याखाली....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...