आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकचे पाणी घाेयगावकडे झेपावले, जलसंकटाचे ढग होणार दूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड  तालुक्यातील चिकलठाण येथील गंधारी नदीला दोन दिवसांच्या पावसानंतर रविवारी पूर आला होता.  छाया : मंगेश ढोबळे - Divya Marathi
कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथील गंधारी नदीला दोन दिवसांच्या पावसानंतर रविवारी पूर आला होता. छाया : मंगेश ढोबळे
वैजापूर- नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे शहरावर निर्माण झालेले जलसंकटाचे ढग आता दूर होणार आहेत. नाशिक पाटबंधारे विभागाने गोदावरी डावा तट कालव्यातून १०० क्युसेक वेगाने पिण्यासाठी पाणी सोडले आहे. हे पाणी मंगळवारी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील घोयगाव येथील साठवण तलावात जमा होण्यास सुरुवात होईल.

नाशिक जिल्ह्यात शनिवार व रविवारी दमदार पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे दारणा धरणातून गोदावरी डावा तट कालव्याला पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. वैजापूर नगरपालिकेला नाशिक पाटबंधारे विभागाशी असलेल्या करारानुसार वर्षभरात एकूण ७८ दशलक्ष घनफूट पाणी मिळत असते. मात्र, मागील वर्षी असमाधानकारक पावसामुळे या धरणात पुरेसा जलसाठा झाला नव्हता. त्यामुळे ६५ दिवसांचे आवर्तन ९० दिवसांवर पोहोचले होते. या आवर्तनात मोठा खंड पडला होता. पर्यायाने शहरवासीयांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली होती. या वर्षी मे महिन्यात नाशिक पाटबंधारे विभागाने अखेरचे आवर्तन सोडले होते. त्यामुळे ऐन जून महिन्यात प्रशासनाने सादर केलेला टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने मंजूर केला होता. मागील महिन्यात साधारणत: ८ दिवस टँकरने शहराला पाणीपुरवठा करण्यात आला होता. दरम्यान, शनिवारी व रविवारी झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणात ५० टक्क्यांहून अधिकचा जलसाठा झाला होता. त्यामुळे नाशिक पाटबंधारे विभागाने मराठवाड्यातील वैजापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील राहाता, शिर्डी यासह ४० गावांतील पिण्याच्या पाण्यासाठी गोदावरी डावा व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. डावा तट कालव्यात रविवारी रात्री सुरुवातीला १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. मंगळवारी सकाळपर्यंत हे पाणी साठवण तलावात येऊन धडकणार आहे.
गोदावरी खळाळली..
वैजापूर | नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे रविवारी रात्री गोदावरी नदीत सोडलेले पाणी सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वैजापूर हद्दीतील डोणगाव शिवारात येऊन धडकले. गोदावरी नदीतील या पाण्याला चांगलीच गती असल्याने अवघ्या काही तासांत हे पाणी वैजापूर तालुक्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. नदीतील पाण्याची ही गती कायम राहिल्यास रात्रीतून हे पाणी पैठण येथील नाथसागरात जाऊन पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शनिवार आणि रविवारी नाशिक जिल्ह्यातील झालेल्या दमदार पावसामुळे रविवारी रात्री ९ वाजता नांदूर मधमेश्वरमधून गोदावरी नदीत १२ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. डोणगाव शिवारातील नदीपात्रात सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पाणी पोहोचले.
बाजारसावंगीमध्ये १२६ मिमी पाऊस
खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी मंडळात सर्वाधिक १२६ मिमी पाऊस झाला आहे. औरंगाबाद ८३, चौका ६५, लाडसावंगी ६५, करमाड ७१, हर्सूल ८२ आणि चिकलठाणा मंडळात ९१ मिमी पाऊस झाला आहे. फुलंब्री तालुक्यातील फुलंब्री ९५, वडोद बाजार ७२, पैठण तालुक्यातील बिडकीन ९०, बालानगर ८०, पाचोड ७५ मीमी आदी.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, जायकवाडी व फुलंब्री, सिल्‍लोड येथील स्‍थिती..
बातम्या आणखी आहेत...