आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टर्मिनलऐवजी ‘यमदूत’ रस्त्यावरच उभे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - वाळूज परिसरातील कंपन्यांतील मालाची ने-आण करणार्‍या मालट्रकांसाठी स्वतंत्र ट्रक टर्मिनल आहे. मात्र, ट्रकचालक रस्त्याच्या कडेलाच ही वाहने उभी केली जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ही अवजड वाहने छोट्या वाहनचालकांसाठी यमदूत ठरत असूनही वाहतूक पोलिस मात्र अनभिज्ञ आहेत.

वाळूज एमआयडीसी परिसरात एक हजार तीनशे लहान मोठे उद्योग आहेत. कंपन्यांना लागणारा कच्चा माल व तयार झालेला माल नेण्यासाठी कंटेनरपासून ते मोठय़ा ट्रकांची गरज असते. ट्रक पार्किंगसाठी कामगार चौकात एमआयडीसीने ट्रक टर्मिनल उभारले आहे. येथे शेकडो ट्रक पार्किंग करण्याची सोय आहे, परंतु ट्रकचालक आपली वाहने टर्मिनलमध्ये न लावता त्या रस्त्याच्या कडेलाच उभी करतात. परिणामी अनेक अपघाताना निमंत्रण मिळते.

महामार्गाची कोंडी : औरंगाबाद नगर महामार्गावर रात्रंदिवस हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. हा चारपदरी रस्ता आहे. मात्र, या रस्त्याचा वापर मोठी वाहने उभी करण्यासाठी केला जातो. या महामार्गावर दरदिवसाला किमान तीन ते चार अपघात हमखास होतात.

पोलिसांचे दुर्लक्ष : नगर नाका ते वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध पार्किंग करणार्‍या ट्रक चालकांविरुद्ध अपवादात्मक स्थितीतच कारवाई केली जाते. केवळ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याचा सपाटा वाहतूक पोलिसांनी लावला आहे. मात्र, ट्रक चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे सौजन्य पोलिस दाखवत नाहीत.

दुचाकीस्वारांनाच पेलिसांचा दणका: भर रस्त्यावर अैवध पार्किंग करणार्‍या ट्रकचालकांना सोडून वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वारांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. वाळूज महामार्गावर कारवाई करण्यात पोलिस दंग आहेत, परंतु मुख्य समस्येकडे लक्ष देण्यास ते तयार नाहीत. बुधवारी वाळूज महामार्गावर शेकडो दुचाकीस्वारांना पावत्या देण्यात आल्या.

पार्किंगचे पैसे वाचवण्यासाठी रस्त्याचा आधार : ट्रक टर्मिनलमध्ये लागणारे थोडे पैसे वाचवण्यासाठी ट्रकचालक वाहने कुठेही उभी करतात. ट्रकचालकांनी आपली वाहनी पार्किंगमध्ये लावावी, अशी मागणी होत आहे. _


रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले
रस्त्यावर उभ्या वाहनांचा त्रास होतो. याबाबत एमआयडीसी व पोलिसांत तक्रारी करूनही काहीच फायदा होत नाही. बाळासाहेब राऊत, रहिवासी

मुलांची काळजी वाटते
मुले सुटीनंतर घरी येतात तेव्हा आमचा जीव टांगणीला असतो. उभ्या गाड्यांवर धडकून मुले गंभीर जखमी होतात. गौतम चोपडा, रहिवासी