आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘डॉ. हेडगेवार’चा सेवाभाव गुगलच्या स्पर्धेत सर्वोत्तम!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘गुगल’नेआयोजित केलेल्या ‘गुगल ऑनलाईन मार्केटिंग चॅलेंज’ स्पर्धेत सहभागी होऊन मार्केटिंग करताना एखाद्या रुग्णालयातील सेवेचे मार्केटिंग करणे हे आमच्यापुढे आव्हान होते. पण, डॉ. हेडगेवार रुग्णालयात देण्यात येणारी सेवा स्पर्धेत भावनिक साद घालणारी ठरली. सेवेमागील भावनांचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की, त्यामुळे यश आमच्यापर्यंत चालत आले, असे मत विजयी संघातील उर्वी तलाटी हिने व्यक्त केले.
“गुगल’च्या स्पर्धेत जगभरातील ६० देशांतील २१०० संघांवर मात करत मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड इंजिनिअरिंगच्या सहा विद्यार्थ्यांनी यश मिळवले. त्यांचा सत्कार सोहळा शनिवारी डॉ. हेडगेवार रूग्णालयात झाला. यावेळी उर्मीने भावना व्यक्त केल्या. प्रा. शिल्पा सावंत यांच्या मार्गदर्शनात अनिरूद्ध पंढरे, आकाश पांडे, उर्वी तलाटी, रिनी अॅन्टोनी, धनंजय ठाकेर देवर्ष गणात्रा यांनी हा प्रकल्प केला होता. सत्कार सोहळ्याला रुग्णालयाचे सीईओ डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, उपाध्यक्षा डॉ. मंजू कुलकर्णी, डॉ. अनंत पंढेरे, डॉ. सीमा पंढरे, पदाधिकारी आणि डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनिरुद्ध पंढरे म्हणाला की, एखाद्या प्रॉडक्टची मार्केटिंग करणे सहज सोपे असते. पण, जेव्हा अशा प्रकारच्या सेवेची मार्केटिंग करायची तेव्हा मोठे आव्हान असते. गुगलच्या पुरस्कारासह या प्रकल्पाला आमच्या मार्केटिंगमुळे १५ लाखांच्या आसपास मदत झाली, हाच आमचा खरा पुरस्कार आहे.
बातम्या आणखी आहेत...