आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड लाखाच्या औषधांसह "हेडगेवार'चा चमू जम्मूला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद | नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे पथक जम्मू येथे गेले आहे. दीड लाखाचा औषधी साठा घेऊन चार डॉक्टर आज रवाना झाले आहेत. देशातील प्रत्येक संकटात रुग्णालयाने मदतीचा हात दिला आहे.

यापूर्वी लातूर जिल्ह्यातील किल्लारी भूकंपाच्या वेळी दोन महिने डॉक्टरांचा चमू तेथे तळ ठोकून होता. कोकणातील महाड गावी आलेल्या पुरानंतर डॉक्टरांनी २१ दिवस सातत्यपूर्ण रुग्णसेवा दिली. एवढेच नाही तर गुजरातमधील भूकंपावेळी भरूच या गावी डॉक्टरांच्या १२ टीम अडीच महिने अविरत सेवा देत होत्या. या काळात एक संपूर्ण रुग्णालय १० मोबाइल दवाखाने चालवत १८५ शस्त्रक्रिया डॉक्टरांनी केल्या, असे हेडगेवार रुग्णालयाचे संचालक डॉ. अनंत पंढेरे यांनी सांगितले.
रवाना झालेल्या पथकात डॉ. राजेंद्र आसने, डॉ. नितीन बोरसे, डॉ. तेजस्विनी कुलकर्णी, डॉ. क्षितिज गर्गे यांचा समावेश आहे. जम्मू येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती कार्यालयात ते दाखल होतील. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर काश्मिरातील दुर्गम भागात औषधोपचार देतील.