आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईहून औरंगाबादकडे येणारे हेलिकॉप्टर ठाण्याजवळ कोसळले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/औरंगाबाद - मुंबईहून औरंगाबादकडे येणारे हेलिकॉप्टर ठाण्याजवळ कोसळले आहे. रविवारी सकाळी युनायटेड हेलिचॉर्टस कंपनीचे हे हेलिकॉप्टर मुंबईहून नागपूरकडे निघाले होते. औरंगाबाद येथे इंधन भरण्यासाठी थांबून पुढे नागपूरकडे उड्डाण करणार होते, अशी माहिती औरंगाबाद विमानतळ अधिका-यांनी दिली आहे.

मुंबईहून उड्डान केल्यानंतर ठाण्याजवळ विजेच्या तारांमध्ये अडकल्याने हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. ठाण्याजवळ जुन्नर-टोकावडे वेशीजवळ हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. यात युनायटेड हेलिचॉर्टस कंपनीचे चार कर्मचारी होते. या अपघातात पाच जण दगावल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. ठाणे ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्याला सुरवात झाली आहे.

कॅप्टन भदोरिया आणि सहवैमानिक अॅलिन यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत असलेले कॅप्टन माटा, यतिन, डिन डिसूझा यांचांही मृतांमध्ये समावेश आहे.