आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ-अजिंठासह राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी हेलिकॉप्टर सेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने पवनहंस या सार्वजनिक क्षेत्रातील हेलिकॉप्टर सेवा कंपनीबरोबर सहमती पत्रावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ- अजिंठा लेणीसह राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी लवकरच हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पर्यटकांमध्ये, विशेषत: परदेशी पर्यटकांमध्ये हेलिकॉप्टर सेवेचे आकर्षण पाहता पवनहंस कंपनीशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ३० डिसेंबर रोजी सामंजस्य करार केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. एलिफंटा बेट, औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ व अजिंठा लेणी, रत्नागिरीतील गणपती पुळे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, अॅम्बी व्हॅली या पर्यटनस्थळी ही सेवा असेल. या सेवेच्या प्रारंभाबरोबरच पर्यटकांना स्वस्त दरांत ये-जा करण्यासाठी हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध होईल. फारसा खर्च न करता त्यांना हवाई आणि भूपृष्ठावरील सौंदर्याचा आस्वाद घेता येईल, असे फडणवीस म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...