आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Helipad At Verul, Ellora Caves, Issue In Marathwada

हेलिपॅड वेरूळ गावातच व्हावा; ग्रामस्थांसह सदस्य, सरपंचांची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ- जगप्रसिद्ध वेरूळ लेणीसह अजिंठा, एलिफंटा बेट, गणपतीपुळे, तारकर्ली, अॅम्बी व्हॅली या पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसीने ३० डिसेंबर रोजी पवनहंस या कंपनीसोबत करार केला आहे. लवकरच ही सेवा सुरू हाेण्याचे संकेत मिळत असताना वेरूळ येथे आजपर्यंत हेलिपॅड नसल्याने या सेवेकरिता भविष्यात वेरूळ गावातच हेलिपॅड तयार करावे, अशी मागणी ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांनी केली आहे. या प्रकरणी "दिव्य मराठी'ने २० मे २०१३ रोजी "अजिंठ्याच्या धर्तीवर वेरूळला हेलिपॅड उभारण्याची मागणी' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. राज्यसभा सदस्य राजकुमार धूत यांनी वेरूळ गावाची सांसद आदर्श दत्तक ग्राम योजनेसाठी निवड केल्यानंतर अनेक विकासकामांना प्रारंभ झाला. रोजगाराच्या दृष्टिकोनातून हेलिपॅड व्हावा.
^हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याअाधीच हेलिपॅड तयार करण्याची जागा आम्ही पर्यटक केंद्राच्या बाजूला आरक्षित केली असल्याने हेलिपॅड वेरूळ येथेच होईल.
- अण्णासाहेब शिंदे, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक