आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मरक्षण कार्याला मदत करा- प्रवीण तोगडिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड-हिंदू धर्मरक्षणाचे कार्य विश्व हिंदू परिषदेने हाती घेतले असून या कार्यासाठी तन-मन-धनाने मदत करण्याचे आवाहन गुरुवारी विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री प्रवीण तोगडिया यांनी सोयगाव येथे आयोजित सभेत केले. गुरुवारी सोयगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
वारकरी संप्रदाय सोयगावचे तालुका अध्यक्ष गाडेकर महाराज सभेच्या अध्यक्षस्थानी होते. विहिंपचे प्रांत सहमंत्री रामदास लहाबर, विभाग सहमंत्री अ‍ॅड. काशिनाथ डापके, बजरंग दलाचे प्रांत संयोजक शिवप्रसाद कोरे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
हिंदू धर्म हा सर्वात जुना पाच हजार वर्षांपूर्वीचा धर्म आहे. ख्रिश्चन दोन हजार व मुस्लिम चौदाशे वर्षांपूर्वीचा आहे. यापेक्षा अधिक काळापूर्वीचे त्यांचे पुरावे नाहीत. हिंदूंवर विविध प्रकारची आक्रमणे ब-याच वेळा झाली; परंतु धर्मरक्षणार्थ प्रत्येक वेळी रक्षणकर्त्याने जन्म घेतला. रावणाने केलेल्या अत्याचारामुळे त्याचा सर्वनाश करण्यासाठी रामाला, तर कौरव व कंसाचा सर्वनाश करण्यासाठी श्रीकृष्णाने जन्म घेऊन धर्मरक्षण केले होते. आज भारतात शंभर कोटी, तर जगात दहा असे एकशे दहा कोटी हिंदू आहेत. सर्व हिंदूंचा पूर्वज एकच आहे. धर्म जाती-पातीत व पंथांत कालांतराने विभागला गेल्याचे सांगून सर्वांनी एकत्रितपणे धर्मरक्षण केले पाहिजे, असे तोगडिया म्हणाले. सूत्रसंचलान कैलास जंजाळ यांनी केले.