आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारगिलच्‍या वेदनाः बाराशे सैनिकांचे प्राण वाचवणारा बेरोजगार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- भारत-पाकिस्तानदरम्यान 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात शंभरावर भूसुरुंग निकामी करून 1200 हून अधिक सैनिकांचे प्राण वाचवणारे हवालदार लक्ष्मण कडुबा चाथे (42, रा. वडोदचाथा, ता. सिल्लोड) यांना एक वर्षापासून बेकारीचे जीवन जगावे लागत आहे. पोलिस दलात सामील होण्यासाठी ते शारीरिक चाचणीत अव्वल आले, पण लेखी परीक्षेत नापास झाल्याने नोकरीला मुकावे लागले.

मुंबईत 1994 मध्ये इंजिनिअर्स ग्रुपमध्ये भरती झालेले चाथे दहावी उत्तीर्ण आहेत. पुण्यात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना अलाहाबाद येथे नियुक्ती मिळाली. पुढे तीन वर्षे त्यांनी श्रीनगरमध्ये सेवा दिली. इतरत्र नियुक्तीचे आदेश मिळणार, तोच एप्रिल 1999 मध्ये कारगिल युद्धाचे ढग जमू लागले. चाथे यांची इतरत्र होणारी नियुक्ती रद्द करून त्यांना द्रास येथे जाण्याचे आदेश 23 मे 1999 रोजी देण्यात आले.

तोफगोळे, फायरिंगने स्वागत
मठियान या द्रास सेक्टरमधील पोस्टवर पहिला मुक्काम झाला. येथे पोहोचताच पाकिस्तानी सैन्याकडून येणार्‍या आर्टिलरी गोळ्यांनी चाथे यांचे स्वागत केले. बंदुकीची फायरिंग व आर्टिलरीच्या गोळ्यांपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी बंकरचा आधार त्यांना घ्यावा लागला.