आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात हायअलर्ट जारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पंजाबच्या गुरुदासपूर येथील दीनानगरच्या पोलिस ठाण्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मंगळवारी याकूब मेमनच्या शिक्षेवर निकाल येणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला असून नाका बंदी, चेक पॉइंट, रेल्वेस्थानक, बसस्थानक, लॉज, हॉटेलची तपासणी करण्यात येत आहे. सर्व पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, आरपीएफ, राखीव पोलिस दल, दंगा पथक काबू पथक, विशेष शाखा, गुन्हे शाखा, चार्ली या सगळ्यांना पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार बंदोबस्ताचे काम देण्यात आले.

बंदोबस्ताचा एक भाग म्हणून पोलिस कर्मचारी सकाळपासून शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येका वाहनांची तपासणी करत आहेत. पोलिसांच्या डॉग स्कॉडलाही रेल्वेस्थानक, बसस्थानकावर फिरवण्यात आले. शहरातील हॉटेल, लॉजिंगची तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांनी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या विमानतळावर नजर ठेवली आहे. शहरातील पर्यटन स्थळांवरही पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. मंगळवारी याकूब मेमनच्या फाशीच्या िशक्षेवर निकाल येणार आहे. त्यामुळे त्याला राजकीय वळण लागू नये म्हणून पोलिस दक्ष आहेत.
पैठण गेटवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. छाया : मनोज पराती.

पोलिसांची करडी नजर
पंजाबयेथील घटनेच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. सर्व पोलिस यंत्रणा बंदोबस्ताच्या कामी लावण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. संदीपआटोळे, पोलिस उपायुक्त