आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Court Judge Injured In Accident On Nagpur Mumbai Road

नागपुर-मुंबई मार्गावरील अपघातात हायकोर्टचे न्यायमूर्ती जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - नागपूर-मुंबई मार्गावर बेलगाव शिवारात रविवारी कार उलटून मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायामूर्ती कैलास चांदवाल यांच्यासह कुटुंबातील चौघे जखमी झाले. वैजापूर उपजिल्हा रुग्णालयातून त्यांना औरंगाबादला हलवण्यात आले. चांदवाल हे शासकीय वाहनाने (एमएच 01 4000) शिर्डीहून औरंगाबादकडे जात होते. दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची गाडी उलटली. न्यायमूर्ती कैलास चांदवाल (57), सुमनबाई चांदवाल (52), सरोज कैलास चांदवाल (48), उत्तम चांदवाल हे जखमी झाले