आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उच्च न्यायालयाचा आदेश येताच अवैध वाहतुकीवर दंडुका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील अवैध वाहतूक रोखण्यासाठी 30 जूनपर्यंत समाधानकारक परिस्थिती आढळून न आल्यास कठोर कारवाईस सामोरे जाण्याची तयारी ठेवण्याचे मौखिक आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून येताच खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने दंडुका उगारला. गुरुवारी (19 जून) मुकुंदवाडी येथील वर्कशॉपमध्ये अवैध वाहतूक करणारी दीडशेवर वाहने जमा केली. वाहनांच्या मालकांना 23 जून रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांसमोर उपस्थित राहण्याची नोटीस वाहतूक शाखेने बजावली आहे. अवैध वाहतूक रोखण्यासाठी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्या. ए. आय. एस. चिमा यांनी स्युमोटो अवमान याचिका दाखल करून घेत सोमवारी (16 जून) वाहतूक सुधारण्यासाठी पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त वाहतूक, उपविभागीय परिवहन अधिकारी, राज्य रस्ते विकास महामंडळ, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदींना तोंडी सूचित केले होते. या आदेशाच्या अनुषंगाने पोलिस विभागाच्या वाहतूक शाखेने धडक कारवाईस प्रारंभ केला. 30 जून रोजी खंडपीठात अहवाल सादर केला जाणार आहे.

टप्पा वाहतूक करण्यास बंदी
बाबा पेट्रोल पंप ते चिकलठाणादरम्यान अ‍ॅपेरिक्षा व आॅटोरिक्षा यांना टप्पा वाहतूक करण्यास परवानगी नसून असे करणाºयांवर 30 जूनपर्यंत कारवाई केली जाईल. बाबा पेट्रोल पंप अथवा चिकलठाणा येथून निघाल्यानंतर मध्ये कुठेच थांबायचे नाही.
ऑटो गटातील वाहनांना मध्ये थांबण्याची परवानगी नसल्याचे वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अजित बो-हाडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.