आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेश देण्याचे हायकोर्टाचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- व्यावसायिक शिक्षण संचालकांनी आयटीआयमध्ये प्रवेश देण्यासंबंधी पाच विद्यार्थ्यांना पत्र दिले होते. असे असतानाही संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. याविरोधात हायकोर्टात दाखल याचिकेच्या सुनावणीत संबंधित पाच विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेश देण्याचे आदेश आैरंगाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी दिले आहेत.
भोकरदन तालुक्यातील दहावी पास विद्यार्थी सतीश गिरणारे, श्रीराम सोनुने, कृष्णा कढ, विनोद मोरे, निखिल वाघ योगेश कढ आदींनी शासकीय आयटीआयसाठी अर्ज केले होते. व्यावसायिक शिक्षण संचालकांनी या विद्यार्थ्यांना प्रवेशाचे पत्र दिले होते. भोकरदन येथील शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र दाखवून आपला प्रवेश निश्चित करण्यासंंबंधी सांगण्यात आले होते. हे विद्यार्थी जुलै २०१५ रोजी प्राचार्यांकडे गेले असता त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. महाविद्यालयातील प्रवेशक्षमता २१ असून तेवढ्या जागा भरण्यात आल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. याविरोधात विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षण संचालकांकडे तक्रार दिल्यानंतर याअनुषंगाने प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. परंतु विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला नाही. यास विद्यार्थ्यांनी अॅड. सिद्धेश्वर ठोंबरेंमार्फत हायकोर्टात आव्हान दिले. हायकोर्टाने या विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर सामावून घेण्याचे आदेशित केले आहे. यातील तिघांना आैरंगाबादच्या किलेअर्क आयटीआय महाविद्यालयात प्रवेश देण्याचे सांगण्यात आले आहे. दोघांना भोकरदन तर एकाला जाफराबाद येथील महाविद्यालयात प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले. शासनाच्या वतीने अॅड. शिरीष सांगळे यांनी बाजू मांडली.