आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Level Loudspeaker Issue At Chawani, Aurangabad

भोंग्यांच्या गोंगाटाने रहिवासी झाले त्रस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - छावणी परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. पॅम्लेट वाटप, प्रचार कार्यालयांत कार्यकर्त्यांच्या बैठका जोरात सुरू आहेत. उमेदवारांनी प्रचारासाठी रिक्षांवर भोंगे लावले आहेत. मात्र या भोंग्यांच्या कलकलाटामुळे मतदारांची डोकेदुखी वाढली आहे. कधी एकदाची निवडणूक पार पडते, याचीच मतदारांना प्रतीक्षा लागून आहे.

छावणीत सायंकाळी पाचनंतर प्रचाराचा जोर वाढत आहे. चौकाचौकांत निवडणुकीच्या गप्पा रंगत आहेत. मात्र उमेदवारांच्या प्रचाराकडे छावणी परिषदेचे कोणतेही लक्ष नाही. विशेष म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी आणि छावणी परिषदेचे कर्मचारी, अधिकारी यांच्यात समन्वय दिसून येत नाही. ११ तारखेला मतदान होणार असून १० जानेवारीला ५ वाजेपर्यंत प्रचार चालणार आहे.

निवडणुकीत खर्चाची मर्यादा नाही : निवडणुकीत उमेदवारांना खर्चाचा तपशील द्यावा लागत नाही. यामुळे उमेदवार त्यांच्या कुवतीप्रमाणे पैसे खर्च करत आहेत. उमेदवार जास्त असल्यामुळे सर्वच उमेदवार मोकळ्या हाताने खर्च करत आहेत. यामध्ये कार्यकर्त्यांची चांगलीच चंगळ होत असल्याचे दिसते.
प्रचारापासून रोखले...
वॉर्ड क्रमांक ७ मध्ये भाजपचे नेते, माजी उपाध्यक्ष करणसिंग काकस यांच्या पत्नी प्रतिभा काकस यांना मिलिटरी कॅम्पसमध्ये प्रचार करण्यापासून रोखण्यात आले. कॅम्पसमध्ये १५०० मतदार आहेत.
न्यायालयात घेतली धाव
*आम्हाला प्रचारापासून रोखण्यात आले. यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन मिलिटरी परिसरात प्रचार करता येत नाही, असे सांगण्यात आले. या प्रकारामुळे मी न्यायालयात याचिका दाखल केली.
प्रतिभा करणसिंग काकस,भाजप उमेदवार