आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Cut Upto 60 Percent To Beer Companies In Marathwada

मद्य उद्योगांसाठी 60 टक्के पाणी कपात; हायकोर्टाचे निर्देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यासह खान्देश, नगर जिल्ह्यातील उद्योगांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठाने पाणी कपातीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला.

मद्यार्क निर्मिती करणाऱ्या कारखान्यांची दोन टप्प्यांत अनुक्रमे ५० व ६० टक्के पाणी कपात करण्यात येईल. तर साधारण उद्योगांची अनुक्रमे २० व २५ टक्के पाणीकपात होेईल. न्या. संभाजीराव शिंदे व न्या. संगीतराव पाटील यांनी हे अंतरिम आदेश दिले. दरम्यान, कपातीनंतर बचत होणारे पाणी केवळ पिण्यासाठीच वापरावे, असेही हायकोर्टाने स्पष्ट बजावले आहे.

कोपरगाव येथील समाजसेवक संजय काळे यांनी पाण्यासंबंधी वर्षभरापूर्वी जनहित याचिका दाखल केली होती. यावर सुनावणीदरम्यान हे निर्देश देण्यात आले आहेत. पिण्याचे पाणी हा मूलभूत अधिकार असताना औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ७, ६९८ गावांना २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी मिळते. औरंगाबाद शहरातील काही भागात तिसऱ्या तर काही भागात चौथ्या दिवशी पिण्याचे पाणी मिळते. याच प्रकारे राज्यात पिण्याच्या पाण्याची ५० ते ९० टक्के कपात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मद्य उद्योगांची कपात पिण्याच्या पाण्यापेक्षा कमी (५० ते ९० टक्के) करू नये, अशी विनंती अॅड. सतीश तळेकर यांनी याचिकाकर्त्याच्या वतीने युक्तिवादात केली होती.

मद्य उद्योगात वापरले जाणारे पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात असल्याचे याचिकेत नमूद होते. यावर पाण्याच्या वापरासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे संदर्भ अॅड. तळेकर यांनी उच्च न्यायालयात सादर केले होते.

शासनाचा युक्तिवाद
सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे म्हणाले, शासन पिण्याच्या पाण्यास प्राधान्य देत आहे. शासनाने उद्योग, त्यावर आधारित रोजगार, पाण्याची उपलब्धता याचा विचार करून ३० टक्के कपात केली. उद्योजकांनी आणखी १५ टक्के कपातीस संमती दिली आहे. तेव्हा ४५ टक्क्यांपेक्षा जादा पाणी कपात करू नये.

उद्योगांचा युक्तिवाद
यापूर्वी हायकोर्टाने किती पाणी कपात शक्य आहे, असे उद्योगांना विचारले. तेव्हा ४५ टक्क्यांपेक्षा जास्त कपातीमुळे नाचक्की होईल, असा युक्तिवाद करण्यात आला होता. उद्योगांच्या वतीने अॅड. श्रीकांत अदवंत यांनी जादा पाणी कपात केल्यास उद्योगांचे चक्र बिघडून उद्योग बंद पडतील, असा युक्तिवाद केला होता.

पुढील स्‍लाइडवर वाचा, असे आहे जायकवाडी... औरंगाबादच्‍या पाण्याची सद्य:स्थिती... राज्यात 99 मद्यार्कनिर्मिती कारखाने सुरू...