आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमायत बाग बनलीय नो-मोर झोन; 300 पैकी फक्त 25 मोर शिल्लक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद शहराचे मूळ शिल्पकार मलिकंबर यांच्या काळात सुमार चारशे वर्षे अधी वसलेले शहरातील मुघल गार्डन म्हणजे हिमायत बाग. या बागेकडे कृषी विदयापीठाच्या अधिकाऱ्यांचे झाल्याने एकेका‌ळी मोर पक्षांची राजधानी असणारी ही बाग आता नो मोर झोन बनत आहे. चार वर्षापूवी या बागेत तिनशे मोर होते मात्र अमाप वृक्षतोड,मोकाट कुत्र्यांचा हैदोस अन उपद्रवी लोकांच्या घुसखोरीने  हे मुघल गार्डन नष्ट होत आहे.

हिमायत बाग म्हणजे शहराची शान आहे.स‌र्वात मोठा ग्रीन झोन असून वास्तू कलेचा अप्रतिन नमूना आहे.मुघल सम्राट बादशहा औरंगजेब यांची ही आवडती बाग होती त्यांनीच आंब्याच्या अनेक जाती लावल्या त्या काळात सलिम अली तलावतील गाळ त्या काळात येथे आणून टाकल्याने ही जमीन अधिक सुपीक झाली .या परिसरात आठ विहीरी असून येथील शक्कर बावडीला वर्षर पाणी असते मात्र तेथीही टार्गट मुलांचा दिवसभर अड्डा असतो.दररोज शेकडो लोक या ठिकाणी फिरायला जातात पण बागेची चहुबाजूंनी तुटलेली तटबंदी,तारांचे तुटलेले फेन्सींग,दिवसभर दारुड्यांचा वावर,सुरक्षा कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे येथील पक्ष्याचे आणि वृक्षराजी संकटात आली आहे.येथील काटेरी झुटपे नष्ट झाल्याने लांडोरांना अंड्डी घालण्यास सुरक्षीत जागा राहिलेली नाही.

वृक्षांच्या अनेक जाती...
याठिकणी दिडशे एकरात अत्यंत जुने चिंच ,वड,ऊंबर पिंपळ आंबा ,जांबुळ, अंजन, नारळ सावर,काटेसावर, कवठ, लिंब ,भोकर,रिठा, कडूनिंब, आंबा अशी जुनी झाडे आहेत त्यामुळे ेथील जैवविविधता परिपूर्ण आहे.

पक्षांच्या १२८ जाती...
येथे मोर, मोहोळ घार, रक्तलोचन घुबड, पिंगळा, श्रृंगी घुबड,स्वर्गिय नर्तक, नाचरा, हळद्या, धनेश, शिक्रा,तांबट, पोपट, हरियाल, यासह १२८ प्रकारचे पक्षी आढळतात.दिवसभर माणसांचा वावर वाढल्याने येथे मोरांची,पक्षांच्या शिकार होत आहे.झाडेही तोडली जात आहे.

किटकांचे १६० प्रकार...
या सुदंर बनात आजही १६० प्रकारचे किटक,६० पतंग ,४२ प्रकारचे फुलपाखरे ,८ प्रकारचे साप, आठ प्रकाच्या वेली, भर उन्हाळ्यात येथे भरपूर पाणी आणि वक्षांचा गारवा आणि भरपूर खाद्य उपलब्ध लाभला होता परंतु सध्या वृक्षतोड व मानवी हस्तक्षेपामुळे हिमायत बाग नामशेष होत आहे.

जैवविविधतेचा खजिना नष्ट होतोय...
हिमायत बाग ही ऐतिहासिक बाग आहे तसेच जैवविविधतेचा खजिना व .बायोडाव्हर्सिटी हॉट स्पॉट आहे. औरंगाबाद मधील महत्वाचा ऑक्सिजन हब आहे.या बागेत राहणारे पक्षी किटक,सरपाटणारे प्राणी खातात त्यामुळे ही बाग जतन झाली होती.मनपा आणि फलसंशोधन केंद्राचे अधिकारी यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे बाग शेवटच्या घटका मोजत आहे.
- डॉ.किशोर पाठक,पक्षीमित्र

आज इतिहासप्रमींचा कॅन्डल मार्च...
औरंगाबादेतील इतिहास प्रेमी उद्या हिमायत बागेसह शहरतील दरवाजे व एैतिहासिक वास्तू ची होणारी पडझड या विरोधात सायंकाळी ६ वाजता शहागंज येथील गांधी पुतळा ते मनपा ने तोडलेले एैतिहासिक खासगेट (बायजीपूरा) येथे हा मोर्चा काढला जाणार आहे. तमाम इतिहासप्रमेींना मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
बातम्या आणखी आहेत...