आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंदी- मराठी गाण्यांनी जिंकली उपस्थितांची मने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद;"दिव्यमराठी' मधुरिमा क्लबतर्फे आयोजित अॅक्वारेक्स प्रस्तुत गृहिणी नं. १, सीझन-२ च्या सोळाव्या दिवशी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विविध स्पर्धांमधून महिलांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. हिंदी- मराठी चित्रपटांतील गाणी गात महिलांनी उपस्थितांची मने जिंकली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य इमारत परिसरात आयोजित कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गीतगायन स्पर्धा, उखाणे, एका पायावर जास्त वेळ उभे राहणे, एका मिनिटात जास्तीत जास्त वस्तू जमा करणे आदी स्पर्धांमधून महिलांनी धमाल केली. मराठी-हिंदी चित्रपटातील सदाबहार गाण्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. एका पायावर जास्तीत जास्त वेळ शरीराचा तोल सांभाळताना स्पर्धकांमध्ये चुरस निर्माण झाली. निवेदन नितीन दीक्षित यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अश्विनी निटूरकर यांनी परिश्रम घेतले.
गृहिणी नंबर ठरलेल्या शीतल पवार,द्वितीय भारती मंत्री,तृतीय स्वाती पवार. छाया: मनोज पराती
१) शीतल पवार : सेमीपैठणी,ग्रॅम गोल्डचे सदाफुली मंगळसूत्र, ग्रॅम गोल्ड ठुशी आणि भिंतीवरील घड्याळ.
२)भारती मंत्री :कुर्ती.
३)स्वाती पवार : साडीकिट.
माय डिजिटल फोटो हबच्या वतीने मॉडेलिंग फोटो काढण्याची संधी देण्यात आली. अरिहंत शेवरोले, वामन हरी पेठे ज्वेलर्सतर्फे भेटवस्तू, वासन आय केअरतर्फे गिफ्ट कुपन तिन्ही विजेत्यांना देण्यात आले.

आजचा कार्यक्रम
शुक्रवार,११ सप्टेंबर रोजीचा कार्यक्रम जागृत हनुमान मंदिर, मोरे चौक, बजाजनगर, वाळूज येथे दुपारी ते दरम्यान होणार आहे. कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा, असे आवाहन क्लबच्या वतीने करण्यात आले.

मोफत नेत्र तपासणी
वासनआय केअरच्या वतीने मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळी ही तपासणी सर्वांसाठी खुली आहे. कल्याणी पैठणीची लकी ड्रॉ बुकिंगही या ठिकाणी केली जात आहे.

हे आहेत मुख्य प्रायोजक
याकार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक अॅक्वारेक्स वॉटर प्युरिफायर आहे, तर ब्राॅट टू बाय वामन हरी पेठे ज्वेलर्स, असोसिएट स्पॉन्सरर अरिहंत शेवरोले आणि पॉवर्ड बाय वासन आय केअर आहे. कार्यक्रमाचे को-स्पॉन्सरर एलआयसी, मैत्री कलेक्शन, द्वारकादास शामकुमार, माय फोटो हब आहेत. गिफ्ट स्पॉन्सरर पैठणी आर्ट गॅलरी, साई सुवर्णचाफा, सोनपरी गोल्ड, संपूर्णम कलेक्शन, कल्याणी पैठणी, कर्तव्या फॅशन पार्क हे आहेत.