आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लुटेरा’ने केला अपेक्षाभंग तर संजूबाबाच्या ‘पोलिसगिरी’ला रसिकांनी नाकारले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सोनाक्षी व रणबीरसिंगची जोडी आणि विक्रमादित्य मोटवाणी यांनी साकारलेली ‘लुटेरा’ची रोमँटिक कथा पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांचा पुरता अपेक्षाभंग झाला. एखादी कादंबरी वाचतोय, असा भास सिनेमा पाहताना होतो. हळूहळू पाने उलटत जातात तसतशी कथा प्रेक्षकांसमोर येते. संजूबाबाची ‘गांधीगिरी’ जशी प्रेक्षकांना भावली तशी ‘पोलिसगिरी’ अजिबात भावली नाही.

‘उडाण’सारख्या पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा दिग्दर्शक विक्रम आदित्य मोटवाणी याने आपले कसब पणाला लावूनही त्याचा ‘लुटेरा’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. अँक्शन आणि कॉमेडीचा ट्रेंड सुरू असताना केवळ रोमँटिक कथेवर प्रेक्षकांचे समाधान होणार नाही हीच या सिनेमाच्या अपयशाची बाजू आहे. सिनेमातले संवादही हळुवार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरणदेखील मोजक्याच ठिकाणी झाले आहे. त्यामुळे एखादी आर्ट फिल्म पाहतोय, असे प्रेक्षकांना जाणवते. मात्र, ज्या प्रेक्षकांना सायलेंट मूव्ही आवडतात किंवा जे प्रेमात हरवले आहेत त्यांना हा सिनेमा पसंतीस पडेल.

संजूबाबाची ओव्हर अँक्शन ‘पोलिसगिरी’ : प्रेक्षकांना टॉलीवूडचे चित्रपट आवडतात म्हणून त्याची कॉपी करावी किंवा नाही याचा विचार दिग्दर्शकांनी करण्याची वेळ आली आहे. पोह्यांवर थोडी कोथिंबीर असली तर ती चवदार लागते. मात्र कोथिंबिरीचे पोहे झाले तर.. असेच काहीसे या सिनेमाचे झाले आहे. ‘पोलिसगिरी’त केवळ अँक्शन आहे. कथेचा ठावठिकाणाही नाही. के. एस. रविकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली असली तरी प्रेक्षकांचे समाधान मात्र झाले नाही

प्रेक्षकांचा कौल
खिळवून ठेवेल अशी कुठलीच बाब या सिनेमात नाही, तरीदेखील गाणे आणि सिनेमातील दृश्ये बघावी वाटली. एसीमध्ये एकांत दिल्याबद्दल प्रेक्षकांनी या सिनेमाला पाचपैकी दोन स्टार दिले आहेत.

काय आहे कथानक ?
वरुण हा प्राचीन मूर्ती आणि मौल्यवान वस्तू चोरणार्‍या टोळीचा सदस्य आहे. मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी तो पाखी हिच्या घरात ऐतिहासिक इमारतींचा तज्ज्ञ म्हणून शिरकाव करतो, पण तो तिच्या प्रेमात पडतो. मात्र, साथीदारांच्या सांगण्यावरून त्याला साखरपुडा सोडून परतावे लागते. या धक्क्याने पाखीच्या वडिलांचा मृत्यू होतो. पाखी आजारी पडते. वरुणला विसरण्यासाठी ती घरदार सोडते. मात्र, तो पुन्हा तिच्या आयुष्यात येतो. पाखीला वाचवण्यासाठी तो प्रयत्नांचा पराकाष्टा करतो.