आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindi Movie Special 26 Story Board Work To Artist Atul Chouthmal

आगामी ‘... 26’ मध्ये औरंगाबाद ‘स्पेशल’; स्टोरी बोर्डचे काम अतुल चौथमलचे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- चित्रपटविश्वात पडद्यावर दिसणार्‍या घडमोडींमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी पडद्यामागे कलाकारांचा मोठा चमू अविरतपणे झटत असतो. औरंगाबादेतील असे अनेक कलाकार या विश्वात आपले वेगळेपण सिद्ध करत आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे अतुल चौथमल. आगामी ‘स्पेशल 26’ चित्रपटासाठी त्याने स्टोरी बोर्डचे काम केले आहे.

स्टोरी बोर्ड ही अलीकडील काळात चित्रपटक्षेत्रात रुजलेली अत्यंत महत्त्वाची बाब आहे. स्टोरीबोर्डच्या आधारे चित्रपटातील प्रत्येक दृश्यासाठीची ब्ल्यूपिंट्र कागदावर उतरवली जाते. शासकीय कला महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या अतुलने आजवर अनेक नावाजलेल्या बिग बजेट चित्रपटांच्या स्टोरीबोर्डचे काम केले आहे. सध्या ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई 2’ या चित्रपटांचे काम सुरू आहे. यापूर्वी ‘मॅक्सिमम’ वीर, रा-वन अशा बिग बजेट सिनेमांच्या स्टोरीबोर्डच्या कामाचा अतुलने अनुभव घेतला आहे. स्टील कंटिन्यूअस फोटोग्राफी, प्रकाशयोजना, मेकअप आर्टिस्ट अशा विविध क्षेत्रांत औरंगाबादच्या कलाकारांची उत्तुंग भरारी येणार्‍या काळातील कलावंतांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

स्टोरी बोर्ड म्हणजे काय?
कागदावर चित्रपटांची विविध दृश्ये उतरवली जातात. कॅ मेरा कुठल्या बाजूला असेल, अभिनेते कुठे उभे राहतील, लाइट कोणत्या बाजूने येईल अशा सर्व बाबींची तपशीलवार माहिती स्टोरीबोर्डमध्ये दिली जाते. यामुळे दृश्य चित्रित करणे सोपे होते.

तांत्रिक अभ्यास गरजेचा : उत्तम डिझाइन काढता येत असल्यास स्टोरीबोर्डचे काम करता येते हा गैरसमज आहे. स्टोरीबोर्ड काढण्यासाठी डिझाइनइतकाच चित्रपट निर्मितीतील बारकाव्यांचा अभ्यास असणे गरजेचे आहे. जोवर तांत्रिक बाजूंचा अंदाज नसेल तोवर कुठलेही दृश्य कल्पनेच्या स्तरावर स्टोरीबोर्ड कलावंताला समजू शकत नाही. यासाठी लाइटच्या फ्रेम, त्यांची तीव्रता, रंग, कॅमेर्‍यासमोर दृश्य कसे दिसेल याचे अंदाज बांधून बोर्ड तयार करावे लागतात.

दिग्दर्शनाचाही अनुभव : अतुल चौथमल यांनी मॅक्सिमम चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. यामधूनच पडद्यावर दाखविण्याच्या प्रत्येक बाबीचा पडद्यामागील अभ्यास करण्याचा दृष्टिकोन अधिक चांगला होतो असा अतुलचा अनुभव आहे.

अनेक वर्ष संघर्ष करून काम मिळविले आहे. आपल्यातील कला सिद्ध करताना संयमाचीही परीक्षा होत असते. माझ्या कामांची दखल घेतली जाते ही पर्शिमांची पावती असल्याचे मी समजतो असे अतुलने सांगितले.

शहरातील इतर कलाप्रेमींना योग्य दिशा मिळाल्यास लवकर यश संपादन करता येईल. त्यासाठी तापडिया नाट्यमंदिरात रविवारी(10 फे ब्रुवारीला) विशेष कार्यशाळा घेणार असल्याचे अतुलने सांगितले. यामध्ये घायल, घातकसारख्या चित्रपटांसाठी अँक्शन दिग्दर्शक म्हणून काम केलेले टिनू आनंद मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय पडद्यामागील इतर कामांमध्ये असलेल्या कामांच्या उत्तमोत्तम संधीविषयीही मार्गदर्शन करण्यात येईल, असे अतुलने सांगितले.