आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त राधे माँ औरंगाबादेत, पोलिसांनी 2 तास केली चौकशी, उद्या शहरातून जाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधे माँ. राधे माँचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. - Divya Marathi
राधे माँ. राधे माँचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
औरंगाबाद - कौटुंबिक छळाचा आरोप असलेली तथाकथित संत राधे माँ मुंबईतून निघून गेली असून औरंगाबादजवळ असलेल्या पडेगावच्या मिडॉज रिसॉर्टवर मुक्कामी आहे. दरम्यान, औरंगाबाद पोलिसांनी तिची दोन तास चौकशी केली. त्यानंतर पोलिस निघून गेले. उद्या सकाळी राधे मॉं नांदेडला जाणार असल्याचे समजते.
मुळच्या पंजाबमधील राधे माँवर मुंबईतील बोरिवली येथील निकी गुप्ता या महिलेने कौटुंबिक छळाचा आरोप केला आहे. त्यामुळे चर्चेत आलेली राधे माँ बद्दल रोज नवे खुलासे होत आहेत.
राधे माँ विरुद्ध निकी गुप्ता हिने कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. सासरची मंडळी हुंड्यासाठी छळ करत असल्याचा निकीचा आरोप आहे. गुप्ता कुटुंब राधे माँचे भक्त आहे. तिच्या सांगण्यावरुनच निकीचा छळ होत असल्याचा तिचा आरोप आहे. तिने दिलेल्या पोलिस तक्रारीत सातव्या क्रमांकावर राधे माँचे नाव आहे.
कोण आहे राधे माँ
पंजाबातील सुखबिर कौर उर्फ बब्बोने दीड दशकापूर्वी महंत रामदिन यांचे शिष्यत्व पत्करले आणि त्यांनीच तिला राधे माँ हे नाव दिले होते. त्यानंतर स्वतःला देवीचा अवतार सांगणाऱ्या राधे माँने मुंबईतील बोरिवलीत येऊन स्वतःचा भक्तवर्ग निर्माण केला. येथे तिने कोट्यवधींची माया जमवली आहे. बोरिवलीतील सहा मजली इमारतीत तिचा दरबार भरत होता. पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्यापासून तिचा 'माता की चौकी' दरबर बंद आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध व्यक्तीमत्वांसोबतचे फोटो जाहिरातीतून झळकवून राधे माँने स्वतःची प्रसिद्धी करुन घेतल्याचे बोलले जाते.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, राधे माँचे पहिले आणि आताचे छायाचित्र व हॉटेल मिडॉज
बातम्या आणखी आहेत...