आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रदीप जैस्वाल यांनी केली हिंदू एकता मंचची स्थापना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हिंदूसण, उत्सवांवर सातत्याने निर्बंध घातले जात आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमावर गदा आणून धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा घाट प्रशासनातर्फे घातला जातोय, अशी भावना हिंदू जनतेत पसरली असून त्यांचा रोष वाढत आहे. अकारण लादले जाणारे निर्बंध उठवण्याची मागणी विविध मंडळ, लेझीम पथकाच्या वतीने होत आहे. त्यासाठी हिंदू एकता मंचची स्थापना करण्यात आल्याची घोषणा माजी आमदार तथा मंचचे प्रमुख मार्गदर्शक प्रदीप जैस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
अन्यायाविरोधात लढा उभारण्यासाठी हिंदू धर्मातील प्रत्येक जात-जमातीचा एकता मंचमध्ये समावेश करण्यात येत आहे. शिवसेना हिंदू धर्माचा पुरस्कृत शक्तिशाली सत्तेतील पक्ष असताना एकता मंच का स्थापन करावासा वाटला, असा प्रश्न विचारला असता, सर्व हिंदू पक्षप्रमुख शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्याकडेही याबाबत दाद मागितली जाईल. हा मंच पक्षविरहित आहे. हिंदूंच्या सण, उत्सव परंपरेवर प्रशासन जाणीवपूर्वक निर्बंध लादत आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गोंधळ जागरण याचा अर्थ काय होतो, हे प्रथम समजून घेणे आवश्यक आहे. लेझीमसाठी सहा महिने पथक तयारी करतात, दांडियासाठी तयारी केली जाते. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले जातात. मात्र वेळेचे बंधन घालून त्यांना रोखले जात आहे. या दडपशाहीतून सांस्कृतिक स्वातंत्र्यावरच गदा आणली गेली आहे. हे सर्व निर्बंध हटवले जावेत, यासाठी मंच काम करणार आहे. त्यासाठी सर्व हिंदूंना एकत्र आणण्यासाठी आठ दिवसांत मेळावा आयोजित केला जाणार असल्याची माहिती जैस्वाल यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...