आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंदू तरुणाच्या पार्थिवाला मुस्लिमांनी दिला खांदा, हिंदू-मुस्लिम सौहार्दाचे उत्तम उदाहरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुस्लिम बहुलवस्तीत वास्तव्यास असलेल्या दोघा अविवाहित भावंडांतील छोट्या भावाचे आजारामुळे सोमवारी निधन झाले. त्याचे पार्थिव घाटीतून घरी आणून ही वार्ता नातेवाइकांना देण्यासाठी तो घराबाहेर पडला. परंतु नातलग आले नाहीत. मात्र अंत्यसंस्करांसाठी संपूर्ण वस्तीच उपस्थित राहिल्याने मोठ्या भावंडाच्या डोळ्यांत दु:खाश्रूंसोबतच सुखाश्रूंनीही गर्दी केली.
मुस्लिम बांधवांसह काही हिंदू मित्रांनी कैलासनगर स्मशानभूमीत राधेश्याम उर्फ रूपेश कुलकर्णी (३५) या तरुणावर अंत्यसंस्कार केले. मोतीकारंजा हरी कमान येथील या घटनेने मैं मुस्लिम हूँ, तू हिन्दू है, हैं दोनों इंसान, ला मैं तेरी गीता पढ़ लूँ, तू पढ ले कुरान, अपने तो दिल में है दोस्त, बस एक ही अरमान, एक थाली में खाना खाये सारा हिन्दुस्तान। या ओळींची प्रचिती दिली.

दत्तात्रय कुलकर्णी पत्नी मंगलाबाई हे वैजापूरहून नोकरीसाठी ४५ वर्षांपूर्वी औरंगाबादेत स्थायिक झाले. तेव्हापासून ते मोतीकारंजा येथील हरी कमानीजवळ सय्यद अतिकोद्दीन यांच्या घरात राहत होते. त्यांना दोन मुले झाली. थोरला संतोष तर धाकटा राधेश्याम ऊर्फ रूपेश याच वस्तीत लहानाचे मोठे झाले. संतोष ४० वर्षांचा असून राधेश्याम ३५ वर्षांचा होता. मुस्लिमबहुल वस्ती असल्यामुळे कुलकर्णी कुटुंबीय ईद इतर सणांमध्ये नेहमी सहभागी व्हायचे, तर त्यांच्या सणावाराला मुस्लिम कुटुंबीय सहभागी होत. त्यामुळे या कुटुंबीयांना इतर ठिकाणी राहण्यासाठी जावे असे कधी वाटलेच नाही. दत्तात्रय कुलकर्णी यांचे १२ जून २००२ रोजी निधन झाले, तर त्यांच्या पत्नी मंगलबाई यांचे त्यांच्या पूर्वी म्हणजे २००० साली निधन झाले. आईवडिलांचे छत्र हरवल्यानंतर दोन्ही भाऊ सोबत राहत होते. दोघांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. संतोष गारमेंटच्या दुकानात कामाला होता, तर राधेश्याम मिळेल तो काम करत होता. दोघेही मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने मोहल्ल्यातील सर्वच त्यांना जीव लावत. राधेश्याम आजारी पडल्याने त्याला संतोषने घाटीत दाखल केले. ही भावंडे अविवाहित असल्याने राधेश्यामला मोहल्ल्यातील मुस्लिम मित्रांसह घरमालकही डबा घेऊन जायचे. मात्र उपचारादरम्यान सोमवारी सकाळी १० वाजता राधेश्यामचे निधन झाले.

मित्रचबनले आप्तेष्ट : संतोषनेत्याचे मित्र सय्यद मेहराज, फारुख, सय्यद शाकेर, अमजद खान, सय्यद शफी, शेख अजहर यांच्या मदतीने राधेश्यामचे पार्थिव घरी आणले. पार्थिवाजवळ मोहल्ल्यातील मुस्लिम मित्र थांबले. संतोष सिडकोतील नातेवाइकाला ही दु:खद वार्ता सांगण्यासाठी गेला. परंतु ते नातेवाईक आलेच नाहीत. शेवटी मुस्लिमांनीच पुढाकार घेत रुग्णवाहिकेने राधेश्यामचे पार्थिव कैलासनगर स्मशानभूमीत नेले. अंत्यविधी आटोपला.

दुकानमालकानेकेली तयारी: संतोषयाने राधेश्याम काम करीत असलेल्या दुकानाच्या मालकाला त्याच्या निधनाची घटना कळवल्यानंतर दुकानमालक संतोष तव्वल यांनी अंत्यविधीचे साहित्य दिले.

मृत राधेश्याम कुटुंबीयांसारखेच
कुलकर्णीकुटुंबीय आमच्या कुटुंबासारखेच आहेत. तेही आम्हाला कधी वेगळे समजत नव्हते. - सय्यद शाकेर, मित्र

रूपेश लहानपणीचा मित्र
रूपेशमाझा बालमित्र. आम्ही त्याच्याकडे हिंदू म्हणून बघितलेच नाही.
शेख कलीम, राधेश्यामचा मित्र

मुलासारखे वागवले
आमचेबालपणमुस्लिम समाजामध्येच गेले. दोघांनाही त्यांनी मुलांप्रमाणे जीव लावला. प्रत्येक सणात आम्ही सहभागी व्हायचो. आईवडिलांच्या निधनानंतरआशियाअापा यांनी तीन महिने स्वयंपाक करून प्रेमाने घास भरवला.
संतोष कुलकर्णी
बातम्या आणखी आहेत...