आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - औरंगाबाद म्हणजे 52 दरवाजांचे शहर अशी एकेकाळी ओळख होती. मात्र आजघडीला फक्त 15 दरवाजे उभे आहेत. याचे योग्य पद्धतीने संवर्धन होत नसल्यामुळे येत्या काही दिवसांत तेही नष्ट होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. मात्र शहराचे गतवैभव जपण्यासाठी एकत्र येण्याची ग्वाही शहरातील उद्योजकांनी दिव्य मराठीच्या ‘कॉफी टेबल’ बुक प्रकाशन कार्यक्रमात दिली होती. दरवाजांचे संवर्धन करण्यासाठी दरवर्षी साधारण 100 कोटींच्या आसपास खर्च अपेक्षित आहे.
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या ताब्यातील दरवाजांची देखभाल तसेच संवर्धन करतो आहोत. मात्र यासाठी उद्योजक समोर येणार असतील तर ही चांगली गोष्ट असून त्यांचे स्वागत असल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी म्हटले आहे. पालिकेच्या ताब्यात असलेल्या 12 दरवाजांची रंगरंगोटी पाच वर्षांपूर्वी पालिकेच्या वतीने करण्यात आली होती. नैसर्गिक लूक देण्याचा चांगला प्रयत्न झाला असून आता नव्याने पुन्हा रंगरंगोटी करण्याची गरज आहे. आजूबाजूला झालेली पडझड रोखणे तसेच तेथे बांधकाम करण्याची गरज आहे. उद्योजक समोर आले तर नियमित देखभाल करणे शक्य होणार आहे.
15 दरवाजे शिल्लक
औरंगाबाद हे एकेकाळी 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जात होते. प्रत्यक्षात आता फक्त 15 दरवाजे शिल्लक म्हणजे उभे आहेत. त्यातील 3 भारतीय पुरातत्त्व विभागाकडे तर उर्वरित 12 महानगरपालिकेकडे आहेत.
पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असलेले दरवाजे : दिल्ली दरवाजा, भडकल गेट आणि मकई गेट
पालिकेच्या ताब्यातील दरवाजे : नौबत दरवाजा, रंगीन दरवाजा, काळा दरवाजा, बारापुल्ला दरवाजा, महेमूद दरवाजा, पैठण दरवाजा, रोशन दरवाजा, खिजरी दरवाजा, जाफर दरवाजा आणि खास दरवाजा.
कोणी पुढे येत असेल तर स्वागत
ऐतिहासिक दरवाजांच्या संवर्धनासाठी संस्था, संघटनांनी समोर यावे, असे आवाहन आम्ही यापूर्वीही केले होते. नव्याने कोणी पुढे येत असेल तर स्वागत आहे. सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन आम्ही त्यांना तशी परवानगी देऊ. प्रत्यक्ष बोलून त्यांना पत्रही देऊ. सखाराम पानझडे, शहर अभियंता.
देखभालीसाठी असा येईल खर्च
रंगरंगोटी करणे, त्यासाठी जुने रंग वापरणे यासाठी प्रत्येक दरवाजासाठी 8 ते 10 लाख रुपये खर्च येऊ शकतो. दर पाच वर्षांनी रंगरंगोटी केली तर दरवाजांची ऐतिहासिकता कायम दिसू शकणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.