आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता रुंदीकरणासाठी ऐतिहासिक दमडी महलवर बुलडोझर, दोनशे वर्षे जुना जमीनदोस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहाबाजार ते गणेश कॉलनी या ३० मीटर प्रस्तावित रस्त्यावरील दोनशे वर्षे जुना दमडी महल अखेर मनपाच्या पथकाने सोमवारी जमीनदोस्त केला. त्याचबरोबर या रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या दोन इतर इमारतीही काढून टाकण्यात आल्या आहेत. 

शहा बाजार ते फाजलपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वळणावर असलेल्या दर्ग्याजवळील नाल्यावर गणेश कॉलनीच्या दिशेने वळण घेणारा एक २० मीटरचा पूल बांधण्यात आला. त्यानंतर दमडी महल पाडून रस्ता गणेश कॉलनीला जोडायचा आहे. त्यानुसार आज हे रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. रुंदीकरणाला बाधा ठरणारे श्रीराम पवार यांच्या दुकानाचे शेडही पाडण्यात आले. त्यांचे घर मात्र तूर्तास वाचले आहे. गरज नसेल तर घर पाडू नका, असे निर्देश महापौर भगवान घडामोडे यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

असा होता दमडी महल
शहरातसब्ज महल, दमडी महल, नौखंडा पॅलेस, जयसिंग पॅलेस, गुलशन महल असे सात महल होते. त्यापैकी दमडी महल हा मलिक अंबर यांच्या काळात तत्कालीन मजुरांनी एकेक दमडी एकत्रित करून बांधला होता, अशी माहिती इतिहासकार सांगतात. या दमडी महलमध्ये भूमी अभिलेख विभागाचे ऐतिहासिक दस्तऐवजही जपून ठेवलेले होते. मनपाने शहर विकास आराखड्यात शहा बाजार ते गणेश कॉलनी असा एक ३० मीटरचा रस्ता प्रस्तावित केला. त्यात हा दमडी महल सोमवारी नेस्तनाबूत करण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...