आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक 143 स्थळांच्या डागडुजीसाठी 4 लाख रुपयांची गरज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील 143 ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी स्थापन केलेल्या हेरिटेज कमिटीची बैठक नुकतीच झाली. या वर्षातली ही पहिली, तर सत्रातील तिसरी बैठक टाऊन हॉलमध्ये होती. या बैठकीतही वारसा स्थळाच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध झाला नाही.
मागील बैठकीतील एकाही निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. अद्यापही ऐतिहासिक स्थळांच्या परिसरातील अतिक्रमणे काढली गेली नाहीत. याही बैठकीत त्याबाबत निर्णय झाला नाही. अतिक्रमण करणा-या नागरिकांना नोटिसा पाठवूनही बराच कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही कारवाई नाही. यासंदर्भात बीबी का मकबरा परिसरातील भट्ट्या काढण्याचा प्रस्ताव प्रदूषण महामंडळाला पाठवला आहे. यावरही ठोस पावले कधी उचलतील हेही रामभरोसेच आहे. 143 ऐतिहासिक स्थळांची सध्याची स्थिती व त्याचा अभ्यास करून त्यांच्या संवर्धनासाठी लागणा-या उपाययोजनेसाठी 4 लाखांच्या निधीची मागणी मनपाकडे केली आहे. पण हे सर्वच मुद्दे अद्यापही अधांतरीच आहेत.
निधी मिळताच कामाला सुरुवात करू - संवर्धनासाठी निधी मिळाल्यानंतरच ठोस पावले उचलली जातील. या ऐतिहासिक स्थळांवर कामे सुरू करायची आहेत. यासाठी मनपाच्या निधीच्या संमतीची वाट पाहत आहे. अतिक्रमणाचा सर्वात मोठा मुद्दा आहे. हे काढण्याकडे जास्तीत जास्त नियोजन करण्यावर भर द्यावा लागणार आहे. - डॉ. दुलारी कुरेशी, हेरिटेज कमिटी सदस्य
* मकई व मेहमूद गेट परिसरातील जड वाहनांना प्रवेश बंद केल्याचे आदेश दिले व लवकरच कारवाई केली जाणार आहे. - जयंत देशपांड,अध्यक्ष, हेरिटेज कमिटी