आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकलठाण्यात तयार होतोय अंतुर किल्ल्याचा ऐतिहासिक दरवाजा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद- गौताळा अभयारण्यातील अंतुरच्या किल्ल्यास नवी झळाळी देण्यासाठी पुरतत्त्व विभाग प्रयत्नरत आहे. गत दोन वर्षांपासून किल्ल्याचे काम सुरू आहे. ऐतिहासिक महत्त्व कायम राहावे, यासाठी किल्ल्याची डागडुजी सुरू आहे. किल्ल्याचे ऐतिहासिक रुपडे कायम राहावे यासाठी जुन्या काळातील हुबेहूब दरवाजे बसवण्यात येणार आहे. 

त्यासाठी असे दरवाजे बनवणाऱ्या कारागिराचा शोध घेण्यात आला. चिकलठाणा येथील अंबादास मिस्त्री आणि मदन मिस्त्री या बापलेकांनी दीड महिन्यात २२ क्विंट्टलच्या या दरवाजांचे काम पूर्ण केले आहे. खास सागवानी लाकूड वापरून तयार केेलेला भव्य दरवाजा ऐतिहासिक काळाची साक्ष देणारा ठरणार आहे. 

प्रथमच मिळाले असे काम 
कारागिरांनाशासनाने २२ क्विंटल लाकूड उपलब्ध करून देण्यात आले. मदन मिस्त्री म्हणाले, साडेआठ फूट रुंद आणि १३ फूट उंच दरवाजा तयार करताना कस लागला. असा दरवाजा बनवण्याचे कंत्राट प्रथमच मिळाले होते. यासाठी जुन्या दरवाजांची पाहणी करून मोजमाप घेतले. जुन्या दरवाजांप्रमाणे सुळे, कडीकोयंडा, खिळे वापरले आहेत. 

चिकलठाण्यासाठी भूषण 
ऐतिहासिक दरवाजाचे काम चिकलठाण्यात होतेय याचे आम्हाला भूषण आहे. अशा स्वरूपाचे काम करणारे कारागीर चिकलठाण्याच्या भूमीत असल्याचे समाधान वाटते. भविष्यात अधिकाधिक पुरातन वस्तूंचे काम व्हावे, त्यातून नवीन पिढीसमोर आदर्श निर्माण होईल. -रमेश दहिहंडे, समाजसेवक, चिकलठाणा 
बातम्या आणखी आहेत...