आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Historical Temple Sasthan Ganesh Issue At Aurangabad

शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राजाबाजारातील संस्थान गणपती हे औरंगाबादचे ग्रामदैवत. नवसाला पावणारा स्वयंभू विघ्नहर्ता अशी या गणपतीची ओळख आहे. संस्थान गणपती हे देवस्थान श्री खडकेश्वर मंदिर आणि सुपारी मारुती या देवस्थानांप्रमाणे प्राचीन आहे. येथील गणेशमूर्ती बसलेल्या रूपात आहे. १९८३ मध्ये संस्थान गणपती मंदिराचे ट्रस्ट स्थापन झाले. शहराचे माजी नगराध्यक्ष बजरंगलालजी शर्मा यांनी या ट्रस्टचे पहिले अध्यक्षपद भूषवले. स्व. शिवनाथमामा लाहोटी, स्व. लक्ष्मण शिंदे, चोरडिया यांच्यासह अनेक गणेशभक्तांनी मंदिराच्या जीर्णोद्धारात सहकार्य केले. श्री संस्थान गणेश मंडळाचा गणपती सार्वजनिक गणेशोत्सवात मानाचा गणपती असतो. मंडळांमध्ये सर्वात आधी येथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते. अनंत चतुर्दशीलाही विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ येथूनच होतो.
संस्थान गणपती येथे अथर्वशीर्षाचे पठण
स्थळ : संस्थान गणपती मंदिरासमोर, राजाबाजार
वेळ : सकाळी ७.०० वाजता