आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाह...दख्खनचा ताज!! औरंगजेबाच्या मुलाने आईच्या आठवणीत उभारली भव्यदिव्य वास्तू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मोगल काळातील बीबी का मकबरा हा स्थापत्य कलेचा उत्तम नमूना आहे. आग्रा येथील ताजमहालच्या निर्मितीनंतर त्याच्याच धर्तीवर दख्खनमध्ये अशी वास्तू असावी, या दृष्टिकोनातून बीबी का मकबरा उभारण्यात आला. फरक इतकाच की, औरंगजेबाचा मुलगा आझमशहा याने त्याची आई दिलरसबानो बेगमच्या आठवणीत उभारला होता.

शहराच्या पश्चिमेस असलेल्या सिहांचल पर्वतरांगांच्या पायथ्याशी हा मकबरा आहे. मकबऱ्यामध्ये केलेले कोरीव नक्षीकाम सर्वांनाच भुरळ पाडणारे आहे. निर्मितीसाठी काही ठिकाणी मार्बलचा वापर करण्यात आला आहे. चारबाग पद्धतीवर मकबऱ्याची निर्मिती झालेली आहे. मकबऱ्याच्या सुरक्षेसाठी येथे भक्कम तटबंदी उभारण्यात आली आहे. तटबंदीच्या चारही बाजूंना अष्टकोनी बुरूज आहेत.

मोगलांच्या काळात पाण्याला विशेष महत्त्व होते. त्यामुळे बहुतेक वास्तू नदीच्या काठी उभारण्यात आल्या. यमुना नदीतीरी ताजमहाल तर बीबी का मकबरा खाम नदीच्या तीरावर उभारण्यात आला.

डॉ. कुरेशी म्हणाल्या, इ.स. 1900 मध्ये निझाम उस्मान अली खान याने शहरात एक आलिशान हॉटेल सुरू केले होते. शहरातून बरेच अंतर असताना त्या हॉटेलपासून मकबरा दिसायचा. मकब-याचे दृश्य दिसावे म्हणून दूरदूरपर्यंत एकही बहुमजली इमारत बांधण्यास त्या वेळी बंदी होती.

पुढे वाचा बीबी का मकबऱ्याचा इतिहास....
बातम्या आणखी आहेत...