आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांतिकारकांच्‍या धाकाने ब्रिटिशांनी उद्धवस्त केला होता हा किल्ला, महाभारताचा साक्षीदार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी 5 ते 23 ऑक्टोबर हा पंधरवडा पर्यटन पर्व म्हणून साजरा करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. पर्यटकांसाठी ऐतिहासिक किल्ल्यांवर राहाण्याची सुविधा भारतीय पुरातत्व विभागाकडून करण्यात येणार आहे. तसेच सध्या शाळांना दिवाळीच्या सुट्या आहेत. या अनुषंगाने आम्‍ही आपल्याला गाविलगड हा मेळघाटातील चिखलदरा येथील गिरीदुर्ग प्रकारातील किल्ल्याची माहिती घेऊन आलो  आहे.

बाराव्‍या शतकात गवळी राजाने (यादव) बांधलेला हा किल्ला मुळचा मातीचा होता. त्यावरूनच त्याला "गाविलगड" हे नाव पडले. आज काही प्रमाणात अस्तित्वात असलेला हा दगडाचा किल्ला बहामणी घराण्यातील नववा राजा अहमदशहा वली याने इ.स. 1425 मध्‍ये बांधल्याचा उल्लेख "तारिख- ए- फरीश्ता" या ग्रंथात सापडतो. पुढे इमादशाही घराण्यातील मूळ पुरुष फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याने किल्ल्याची दुरुस्ती व विस्तार केला.

इतिहासात महत्‍त्‍वाचे नाव असलेल्‍या गाविलगडचे अस्‍तित्‍व मात्र आज धोक्‍यात आले आहे. भक्‍कम इतिहासाची साक्ष देणा-या खुणा आज पुसल्‍या जात आहे. त्‍यामुळे दुर्गप्रेमींनी चिंता व्‍यक्‍त केली आहे. divyamarathi.com च्‍या या पॅकेजमधून जाणून घेऊ गाविलगडची वैशिष्‍ट्ये.

हजार वर्षाचा साक्षीदार
गाविलगड किल्ला हा ब्रिटिश काळाच्या पूर्वीपासून थेट आजपर्यंत सुमारे एक हजार वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. देवगिरीचे यादव, बहामनी, निजामशाही, मोगल व मराठे अशा विविध सत्तांची धुरा या किल्‍ल्‍याने पाहिली आहे. पण 1857 पुर्वी भूमिगत क्रांतिकारकांच्या भीतीने इंग्रजांनी हा सातपुडा पर्वतरांगांच्या मध्यावर असलेल्या गाविलगड ताब्‍यात घेतला नि त्‍याला उद्ध्वस्त केले. व-हाड किंवा इलिचपूर जिंकण्‍यासाठी त्‍या काळी गाविलगड जिंकल्‍याशिवाय पर्याय नव्‍हता. महाभारताच्‍या काळातील अस्तित्व खुणांपासून याला ‘गवळीगड’म्‍हणतात असा संदर्भ आहे. 1200 च्‍या आधी हा बांधला गेला, इ. स. 1185 पासून 1302 पर्यंत देवगिरीच्या यादववंशीय राजांच्या तो ताब्यात होता, असे अभ्‍यासक सांगतात. किल्‍्ल्याच्‍या वास्तुशिल्पांवर यादवकालीन खुणा, तत्‍कालिन शिल्पकलेचा ठसा दिसून येतो.

किल्‍ला पाहण्‍यास लागतो पूर्ण एक दिवस
गाविलगड हा प्रचंड मोठा किल्‍ला असल्‍याने तो पाहण्‍यासाठी पूर्ण एक दिवस लागतो. या किल्‍ल्‍्याचा परिघ सुमारे बारा ते तेरा किलोमीटरचा आहे. चिखलद-यातील मछली तलावाच्‍या शेजारी गाविलगडाचा मछली दरवाजा आहे. तेथून प्रवेश केल्‍यावर दुतर्फा उंच तटबंदी असलेली वाट दुस-या दुसर्‍या दरवाजापाशी घेऊन जाते.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून फोटोंसह जाणुन घ्‍या, किल्‍ल्यामध्‍ये काय आहे.., कोणकोणत्‍या सत्‍तांनी कधी सांभाळली धुरा आणि वैशिष्ट्यपूर्ण शिल्‍प..
बातम्या आणखी आहेत...