आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासातून उलगडले पैठणीचे सोनेरी पदर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा' म्हणत प्रत्येक महिला पैठणीचा आग्रह धरते. याच वैभवशाली पैठणीची गाथा "दिव्य मराठी'च्या "सिटी वॉक' उपक्रमात इतिहास तज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी आणि रफत कुरेशी यांनी कथन केली. औरंगाबादकराला गौरव वाटावा अशा पैठणीचे अनेक पदर या दरम्यान पुढे आले. हा इतिहास ऐकताना ज्येष्ठांच्या डोळ्यात जुने वैभव तरळू लागले, तर तरुणांना संपन्न वारसा मिळाल्याने अभिवान वाटला.

आ तापर्यंत झालेल्या सिटी वॉकपेक्षा हा वॉक सर्वार्थाने वेगळा ठरला. कारण यामध्ये प्राचीन कला आणि त्यामुळे जगाच्या पाठीवर शहराने निर्माण केलेला वस्त्रोद्योगातील दबदबा यांची सोनरी पाने उलटून दाखवणारा ठरला.

पैठणीच्या माध्यमातून कापड जगतात रोम देशासोबत व्यापार करत विश्वाच्या क्षितिजावर पैठणने मान िमळवला. मनुस्मृतीमध्ये उल्लेख असलेल्या पैठणीची भुरळ आजही कायम आहे, यातच तिचे सामर्थ्य लक्षात येते. हिमायत बागेसमोरील उद्धव पाटील चौकात औरंगाबाद हिमरू फॅक्टरी पैठणी दालनासमोर सिटी वॉकला सुरुवात झाली. प्रारंभी हिमरूचा उल्लेख करत रफत कुरेशी यांनी ७०० वर्षांपूर्वी हिमरू औरंगाबादेत कशी आली याचे वर्णने सांिगतली. ते म्हणाले की, माेहंमद तुघलकाने जेव्हा दिल्लीहून राजधानी हलवली तेव्हा आपल्यासोबत सर्वांना घेऊन आला. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला त्याने देवगिरीला आणले. हिमरूचे विणकार कारागीरही यामध्ये होते. पैठणी ही हिमरूच्याही आधीची कला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पैठणी प्राचीन कलाप्रकार, तर हिमरू आणि िबदरी हे मध्ययुगीन कलाप्रकार आहेत. या वेळी "मशरू' ही कलादेखील या भागात आली, मात्र काळाच्या ओघात ती लोप पावली.
पैठणीचा दबदबा रोमपर्यंत : प्रत्येक राज्यातील कला हे तेथील वैशिष्ट्य अन् सौंदर्य होते. प्राचीन कालखंडात सुतारकाम, विणकाम, रंगकाम हे वैशिष्ट्यपूर्ण शैलीने कलावंतांनी पिढ्या दर पिढ्या जतन केले. पैठणी कलेच्या उगमाचा शोध नाही. इतिहासात अनेक संशोधन ग्रंथांतून वेगवेगळे दावे यासदंर्भात आहेत. मनुस्मृतीमध्ये पैठणीचा उल्लेख आहे. सातवाहन काळामध्ये श्री सातकरणी आणि गौतमीपुत्र सातकरणी यांनी पैठणीला उद्योगरूपात ओळख दिली. त्याकाळी पैठणीने रोमनांना आकर्षित केले. रोमचे अनेक लोक पैठणमध्ये वास्तव्यास राहिल्याचे पुरावे आहेत. पैठणीच्या वस्त्रोद्योगाने जगाच्या बाजारपेठेत दबदबा निर्माण केला होता. प्लिनी या रोमन लेखकाने पहिल्या शतकात लिहिलेल्या पुस्तकात पैठणीच्या उद्योगाचा उल्लेख आहे. तर इटालीयन लेखक मार्कोपोलो यानेही पैठणी वस्त्रोद्योगाचा गौरव आपल्या पुस्तकातून केला आहे. प्रामुख्याने रोमला "मसलिन '(मलमल), रेशम आणि जरीचा वापर करून बनवलेले "ब्रोकेड' आणि बक्रम यांची निर्यात केली जात असे. शाही लोक हे कपडे वापरत असत. जगातील प्रत्येक राजा हे वस्त्र परिधान करने गौरवास्पद समजत असे. ब्रोकेड हा सर्वात महत्त्वाचा होता. यामध्ये १ किलो सोन्याला १ ग्रॅम तांब्याचा वापर केला जात असे. बहामनी काळामध्ये हा उद्योग वैभवाच्या शिखरावर होता.

उतरती कळा पिंपळडारीच्या सततच्या आक्रमणानंतर या उद्योगाला उतरती कळा लागली. पुढे उद्योग नाशिक, हैदराबाद आणि पुण्याला स्थलांतरित झाले.

मध्यकालीन हिमरूचेही आकर्षण : महंमद तुघलकाने हिमरू कारागिरांना देवगिरीला आणले. किल्ल्याजवळील परिसरात हिमरूची बाजारपेठ अन् कागदाचा कारखाना असे. मात्र, राणीला त्रास होऊ लागल्याने कागदाची वसाहत हलवण्यात आली, त्यामुळे कागजीपुरा नाव पडले. पुढे मलिक अंबरने हिमरू निर्मितीचा उद्योग औरंगाबादेत हलवला. या वेळी नवाबपुऱ्यामध्ये ५०० विणकाम यंत्रे सुरू होते. अौरंगजेबाच्या दुसऱ्या बायकोचे नाव बायजी, यावरून बाजयीचा बायजीपुराही याच काळात वसलेला भाग आहे.

वस्त्रोद्योगाचे ऐतिहासिक वैभव
मलिक अंबरच्या काळात आपल्या या वस्त्रांची महती एेकून रफिउद्दीन शिराजी इराणहून आले. वस्त्रोद्योगातून मिळणाऱ्या महसुलाची माहिती त्यांनी घेतली. त्या काळात १६ ते १७ लाखांचा महसूल वस्त्रोद्योगातून मिळत असे. राजा अकबराच्या काळामध्ये एक पर्शियन दूत आले होते. त्यांना भेट देण्यात आलेले कापड बनवण्यास पाच वर्षे लागली होती. औरंगजेबाने या उद्योगाला प्रोत्साहन दिले. निझामाची सून दुरेशहवार हिनेही या वस्त्रोद्योगाला विशेष उभारी दिली. बाजीराव पेशवे यांनी मल्हारराव होळकरांना लिहिलेल्या एका पत्रात शाही विवाह सोहळ्यासाठी पैठणहून आलेले कापड आदी उत्तम असल्याचे म्हटले होते. तर माधवराव पेशवे यांनी नाना फडणवीसांना १८ मार्च १७६९ मध्ये लिहिलेल्या पत्रांमध्ये या उद्योगाचे प्रचंड कौतुक केले.
1 कमखाब-शुद्ध रेशमचा हा कपडा प्रचंड महाग होता. यातून राजांचे अश्खन बनवले जात असत. केळकर, प्रिंस ऑफ वेल्स आणि अहमदाबाद, हैदराबादच्या संग्रहालयात आजही हे अश्खन पाहण्यास उपलब्ध आहेत.
2 मशरू-मशरूच्या निर्मितीत टाय-डाय तंत्राचा वापर केला जात असे. सॅटीनचा बेस वापरून या कापडाची निर्मिती होत असे.
3 जामेवार-दोन्ही बाजूने वापरता येईल असा जामेवार कापडही प्रचंड लोकप्रिय होता.
4 हिमरू-हमरू या पर्शियन शब्दावरून हिमरू नाव पडले. कॉटन-सिल्क आणि रेऑनच्या वापरातून याची निर्मिती होत असे. िनझामकाळात हिमरूतून शेरवानी बनवली जात असे, तर पैजामा-चोळी-घागरा आणि जॅकेट मशरूतून बनवले जात असत.
आताचे शिलेदार
सध्या अब्दुल हामिद कुरेशी यांनी हिमरू टिकवण्यासाठी काळातील प्रावरणांत त्याचे रूपांतर केले. यासाठी वुलन, सिल्क आणि कॉटनचा वापर करून िहमरू शालींच्या निर्मिती केली. आता टाय, स्टोल्स, जॅकेट मिळतात. सध्या अहेमद सईद कुरैशी आणि त्यांचा मुलगा इम्रान अहेमद कुरैशी, आमेर कुरैशी उद्योगाचे वैभव टिकवून आहेत.
प्राचीन पैठणीचे जतन आणि संवर्धन
शमीम अहेमद गिराण आजही पैठणीचे पारंपरिक सौंदर्य टिकवून आहेत. पैठणमध्ये त्यांनी विविध नव्या पद्धतीच्या कापडांवर पैठणी वर्क तर केलेच पण अतिप्राचीन पैठण्या आजही त्यांच्याकडे आहेत. पैठणीच्या संवर्धनात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे २००९ ला संत कबीर पुरस्काराने त्यांना शासनाच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे.

बिदरी कला केली पुनरुज्जीिवत
विजापूरच्या अब्दुल्ला बिन खैसर यांनी बिदरी कला अस्तित्वात आणली. बहामनी बादशाही अस्ताला गेल्यानंतर बरीदशाही कुटंुबाने १३४७ मध्ये या कलेला आश्रय दिला. त्यांचे मूळ गाव बिदर असल्याने कला बिदरी नावाने ओळखली जाऊ लागली. नवसागर आणि मीठयुक्त मातीपासून बनवलेला काळा रंग ४०० वर्षांपासून टिकून आहेत. नवाबपुऱ्यातील हिमरू फॅक्टरीमध्ये मधुकर गवई यांनी ५० वर्षांपूर्वी बिदरी कलावंतांना प्रशिक्षणासाठी आमंत्रित केले. सध्या त्यांचे पुत्र विजय गवई बिदरी कलाप्रकाराला जतन करत आहेत.