आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवकालीन शस्त्रभांडारात होता या तलवारींचा प्रभाव, जाणुन घ्‍या हे काही प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या काळात शस्त्रांना विशेष महत्‍त्‍व होते. शिवाजी आणि संभाजी महाराज यांनी त्‍याच्‍या राज्‍यात दारुगोळा कोठारे आणि शस्त्र तयार करणारे कारखाने उभारले होते. शत्रुंना संपवण्‍यासाठी तेव्‍हा बिचवा, कट्यार, तलवारीसारखी शस्‍त्रेच अधिक प्रभावी होती. divyamarathi.com च्‍या या पॅकेजमध्‍ये फोटोंसह जाणून घ्‍या, कशा होत्‍या शिवकालीन तलवारी.
- तलवारीचे प्रकार
समशेर (मोगली), खंडा तलवार (मराठा) ,राजस्थानी किंवा राजपुती तलवार, गुर्ज ,पट्टा ,आरमार तलवार ,मानकरी तलवार आदी तलवारीचे काही प्रमुख प्रकार आहेत. तलवार पकडण्‍याची मुठ आणि पात्‍यावरूनही तलवारीचे 40 च्‍या जवळपास प्रकार आहेत. हस्‍तिदंत, पोलादी, पितळी, मुठी तांबे असे तलवारीचे उपप्रकार पुर्वी होते. त्‍यापैकी, खंडा, मुल्‍हेरी, फटका, मराठा या तलवारीही प्रसिद्ध होत्‍या.
- 42 किलो वजनाची तलवार
सासवड जवळ असलेल्‍या सोनोरी गावाचे मल्हार रामराव पानसे यांनी खंडोबाला अर्पण केलेली खंडा तलवार सुमारे 42 किलो वजनाची तलवार आहे. अशा प्रकारची वजनदार आणि भव्‍य तलवार ही एकमेव आहे. या तलवारीचा युद्धात वापर करत नसत. आजही ही तलवार तेथे असून तिची पूजा केली जाते.
- आधुनिक काळातील तलवारी
आधुनिक काळात प्रदेशावरून तलवारीची ओळख होऊ लागली. उदाणार्थ जर्मनीची आलेमानी तलवार, मुल्‍हेर, महाराष्‍ट्राची मुल्हेरी, हुसेनी, भवानी अशा तलवारी. काही तलवारी या स्‍वरूपावरून ओळखल्‍या जातात जसे, सरळ, रुंद दुधारी, बिनमुठीच्या तलवारी. कुशाणकालात आखूड, सरळ, त्रिकोणी टोक असलेल्या तलवारी होत्‍या. वाकाटककालीन अजिंठा लेण्यामध्‍ये दिसणारी तलवार ही रूंद टोकाची असल्‍याचे दिसते.
- इराणी व तुर्की या तलवारी तेराव्या-चौदाव्या शतकाच्‍या सुमारास भारतात येऊ लागल्या. पुढे मराठे स्पेन, इटली, जर्मनी येथे तयार झालेली पाती घेत असत नि त्‍याला हिंदू पद्धतीच्या लवंगी, डेरेदार व खोपडी मुठी बसविल्या जात असत. मराठी कल्‍पनेतून तीन तलवारी तयार झाल्‍या. पट्टा, सकेला किंवा धूप आणि किरच अशी त्‍यांची नावे आहेत. पट्टा हा इतर तलवारींपेक्षा जास्त परिणामकारक होता. भवानी तलवार ही ‘पट्टा’ पद्धतीची तलवार असावी, असा पाश्चिमात्य तज्‍ज्ञांचा अभिप्राय आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, शिवकालीन तलवारींचे स्‍वरूप..