औरंगाबाद- धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणजे क्रांती दिवस होय. प्रत्येकाने अंतर्मुख होऊन चिंतन करायला हवे, असे मत विचारवंत, लेखक आणि संशोधक डॉ. रा. का. क्षीरसागर यांनी व्यक्त केले. बोधिसत्त्व प्रतिष्ठानच्या वतीने व्या धम्मचक्र प्रर्वतन दिनाच्या निमित्ताने "धम्मचक्र प्रर्वतन दिन : इतिहास, वर्तमान आणि भविष्य' या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. अॅड. खंडागळे म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी आंबडकरी चळवळींचा संदर्भ देत राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये दलितांची स्थिती आणि भविष्याची भूमिका मांडली होती. बुद्ध धम्माचा स्वीकार हे एक क्रांतिकारी पाऊल होते. त्यांच्या मागे ज्यांनी हा धम्म स्वीकारला त्यांचे कल्याण झाले. याप्रसंगी भन्ते डॉ. सत्यपाल महास्थवीर, बौद्ध वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. अरविंद गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते - रिपब्लिकन नेते अॅड. रमेश खंडागळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. डॉ. गायकवाड म्हणाले, बुद्ध धम्माचा उगम, प्रचार आणि प्रसार यावर सखोल मार्गदर्शन केले. जगात बुद्धिझम शाश्वत आहे म्हणूनच
आपले भवितव्य सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा. एस. एस. वालदे यांनी प्रास्ताविक केले. एम. डी. बनकर यांनी आभार मानले. मार्गदर्शन करताना डॉ. अरविंद गायकवाड. सोबत अॅड. रमेश खंडागळे, प्राचार्य रा. का. क्षीरसागर, डॉ. गंगाधर पानतावणे, प्रमोद खोब्रागडे, प्रा. एस. एस. वाल्दे.