आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hobby News In Marathi, Abhikesh Collect The Small Car At Nashik, Divya Marathi

चिमुकल्‍या कारचे सुसाट विश्‍व, अभिषेक यांचा छोट्या कारचा संग्रह! बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालपणी खेळण्यांची आपली एक दुनिया असते. या वयात प्रत्येकालाच गाड्या, घोडे यांचा खास लळा असतो, पण वाढत्या वयासोबत अनेक जण यापासून दूरावतात, पण काही जण असे असतात की, अशी खेळणी त्यांच्या आयुष्यात कायम राहतात. जळगावमधील शासकीय कंत्राटदार असणार्‍या अभिषेक कौल यांनीदेखील बालपणापासून कार मॉडेल्स गोळा करण्याचा छंद जपला आहे. त्यांच्या संग्रहात वाफेवर चालणार्‍या गाडीपासून सध्या टोयोटा, इटिऑसपर्यंत कार मॉडेल्स आहेत.

कार मॉडेलचे वेड
कार मॉडेल्स आणि खेळण्याची गाड्या यामध्ये मोठा फरक असतो. खेळण्यातील गाड्या या सर्वसाधरणपणे त्या कारची नक्कल आणि ओबडधोबड स्वरुपात असतात. तर कार मॉडेल म्हणजे त्या कारची लहान आकाराची हुबेहुब प्रतिकृती. मॉडेल्स दिसायला आणि ठेवणीला अगदी जशाच तशी असतात. म्हणजे त्यांची चाके, दरवाजे, इंजिन अगदी खर्‍याखुर्‍या गाडीप्रमाणे असतात. अभिषेक यांच्या संग्रहात अशा तब्बल 3 हजार 800 कार मॉडेल्स आहेत. त्यापैकी साधारणत: 1200 अस्सल कार मॉडेल्सच्या प्रतिकृती आहेत. खर्‍याखुर्‍या कारप्रमाणेच दिसणार्‍या व त्यांना रबराचे चाके, उघड-झाप होणार्‍या खिडक्या, त्याचे दिसणारे इंजिन अशी यांची वैशिष्ट्ये आहेत, परंतु त्या विशिष्ट मापात बनवण्यात आलेल्या नाहीत. उर्वरित 2600 मॉडेल्स या मूळ कारच्या मापांप्रमाणे प्रतिकृती आहेत. त्यांना स्केल मॉडेल असेही म्हणतात. संग्रहात सर्वात मोठी 1:6 आकाराची प्रतिकृती महत्त्वाची, ज्याची किंमत चार ते पाच लाखांपर्यंत जाते.

वयाच्या चौथ्या वर्षापासून लळा
वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांनी आणलेली खेळणे आयुष्याचा अविभाज्य अंग होईल अशी अभिषेकला कल्पना देखील नव्हती. वडिलांनी आणलेली कार आवडली. ती जपण्यात त्याला जास्त आनंद मिळत होता. ही कार व्यवस्थित वापरली नाही, तर ती तुटेल हे कळताच अभिषेकने ही कार एवढी जिवापाड जपली की, ती आजही त्यांच्या संग्रहात व्यवस्थित आहे.

विविध देशांतील कार मॉडेल्स
युरोपियन देशात कार मॉडेल्सचा छंद असणार्‍यांची संख्या जास्त आहे, परंतु भारतात अशा प्रकारचा छंद जोपासणारे फार थोडे लोक पाहावयास मिळतात. अभिषेक यांच्या संग्रहात ऑडी, बीएमडब्ल्यू, र्मसिडीझ, रोल्स रॉइस, फेरारी, फियाट, व्होल्वो, फोक्सव्ॉगन, मारुती सुझुकी, टोयोटा, ह्युंदाई, होंडा अशा विविध कंपन्यांची आकर्षक प्रतिकृती संग्रहाची शोभा वाढवतात.

पुढील स्‍लाइडवर पाहा, छोट्या कारचे भन्‍नाट फोटोग्राफ...