आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकीत रक्कम मिळाल्याने पेन्शनधारकांना दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ३९ महिन्यांची थकीत रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम जमा करण्याची मागणी मजीप्राच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी शासनाकडे केली होती. त्यानंतर नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार शासनातर्फे नगरविकास व ग्रामविकास विभाग यांना देण्यात येणाऱ्या २०१५च्या निधीतून मजीप्राला २५० कोटी रुपये सहाव्या वेतनाची थकीत रक्कम अदा करण्याकरिता आदेश दिले होते.
त्यानंतर ३९ महिन्यांची थकीत रक्कम जमा करण्याकरिता सहकार्य केल्याबद्दल उपमुख्य लेखाधिकारी विनायक साठे, सूर्यकांत इंदप, श्रीमती तेजवानीसह अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार मानल्याचे सेवानिवृत्त कर्मचारी द. बा. जगधने, सुधाकर बुराडे, एस. बी. वैद्य, मिर्झा बेग, ठाकूर, सुरडकर, आर. एस. जयस्वाल यांनी कळवले आहे.
बातम्या आणखी आहेत...