आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरड्या रंगांनी धुळवड साजरी, ‘रंग बरसे भिगे चुनरवाली’च्या तालावर थिरकली तरुणाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘रंग बरसे भिगे चुनरवाली’ किंवा ‘बुरा न मानो होली है’ म्हणत डीजे च्या तालावर थिरकणारे आपले शहर यंदा कोरड्या रंगांत न्हावून निघाले. कोरडे आणि इको फ्रेंडली रंग खेळून शहरवासीयांनी शिमगा (धूलिवंदन) साजरा केल्याचे शहराच्या विविध भागांत दिसून आले.

राजकीय पक्ष असो, निसर्गप्रेमी स्वयंसेवी संस्था किंवा संघटना, महिला मंडळ, शाळा आणि महाविद्यालये सर्वांनीच पाणीटंचाईचे भीषण वास्तव पाहता पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला. सिडको, हडको या मध्यमवर्गीय वसाहतींसोबतच उल्कानगरी, एन 4, वेदांतनगर, महेशनगर, विद्यानगर, उस्मानपुरा, गुलमंडी, निरालाबाजार, नागेश्वरवाडी, सर्मथनगर आदी वसाहतींमध्येही कोरड्याच रंगांत एकमेकांना रंगवत धूलिवंदन साजरे करण्यात आले.

पाण्याचे टँकर रिते केले जात असलेल्या धनिकांनीही पाणी वाचवत कोरड्या नैसर्गिक रंगांना प्राधान्य दिले. पाणी वाचवण्यासाठी तसेच त्वचेचे रक्षण करण्यासाठी असलेल्या नैसर्गिक रंगांचे महत्त्व आता सर्वांनाच पटले असल्याने रासायनिक रंगांऐवजी याच रंगांचा वापर नागरिकांनी केलेला दिसून आला.