आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणपूरक रंगांचे जल्लोषमय धूलिवंदन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-ब‘बुरा न मानो होली है’ म्हणत बच्चे कंपनी, तरुणाईसह मोठय़ांनीही होळीच्या गाण्यांवर ठेका धरला. सकाळी सातपासून सुरू झालेला रंगपंचमीचा उत्साह दुपारी तीन वाजेपर्यंत दिसून आला.
शाळा, महिला मंडळे आणि संस्था, कॉलनीमध्ये नैसर्गिक रंगाचा फायदा आणि निर्मितीसंदर्भात कार्यशाळा घेण्यात आल्याने पर्यावरणपूरक रंगांविषयीची जागृती समाजाच्या सर्व स्तरांमध्ये दिसून आली. रासायनिक रंगांचा वापर, पाण्याची होणारी नासाडी टाळणे याबरोबर त्वचेची काळजी घेत रंगोत्सव साजरा करण्यात आला. केस आणि त्वचेला तेल तसेच मॉइश्चराइजरचा वापर केलेला असल्याने रंग उतरवणे सोपे झाले. लाल, पिवळा, हिरवा, निळा, गुलाबी अशा विविध रंगांचे चेहरे जल्लोष करताना ठिकठिकाणी दिसून आले.
तरुणांप्रमाणेच तरुणींनी केला जल्लोष : हॉस्टेल्समध्ये तरुण-तरुणींनी डी. जे. लावून रंगोत्सवाचा जल्लोष केला. अनेकींनी रंगलेल्या चेहर्‍यांनी मित्रांसह शहराची रपेट मारली. गाड्यांवरून फिरणारे तरुण-तरुणी जल्लोष करत उत्सवाचा आनंद घेत होते. महिलाही होळीचा आनंद लुटताना दिसल्या. जुन्या शहरासह सिडको, हडको, शिवाजीनगर, सातारा परिसर अशा भागांत तीन वाजेपर्यंत उत्सवाचा जल्लोष दिसून आला.
बच्चे कंपनीचा उत्साह : कार्टून्स आणि विविध रंगी आकर्षक पिचकार्‍यांनी रंग उडवत बच्चे कंपनीने धमाल केली. लुंगी डान्स आणि होळीच्या गाण्यांवर ठेका धरला. र्शेयनगर, जालना रोड, टीव्ही सेंटर परिसरात बच्चे कपंनी रस्त्याने फिरणार्‍या तरुण-तरुणींवर रंग टाकताना दिसले.
दीपशिखाचा उपक्रम: नैसर्गिक रंग बनवण्याचे प्रशिक्षण दीपशिखा फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा चौधरी यांनी व्यंकटेश पब्लिक स्कूल येथे दिले. हाच उपक्रम र्शी बालाजी प्राथमिक शाळा, चिकलठाणा, वसंतदादा पाटील हायस्कूल, ज्ञानकिरण प्राथमिक शाळा, व्यंकटेश प्राथमिक शाळा जाधववाडी, व्यंकटेश हायस्कूल आदी शाळांमध्ये राबवला.