आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Holiday Special Train Not Running Via Aurangabad

नांदेड-जम्मू तावी एक्स्प्रेस औरंगाबादला वगळले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी केलेल्या घोषणेला दक्षिण मध्य अधिका-यांनी हरताळ फासला आहे. नांदेड, औरंगाबादमार्गे अमृतसर जम्मू तावी विशेष गाडी सुरू करा, या बन्सल यांच्या आदेशाला धुडकावून नांदेड अकोलामार्गे ही रेल्वे सुरू होत आहे.

बन्सल 29 मार्च रोजी औरंगाबादेत होते. मराठवाडा रेल्वे विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा, सुधाकरनाना चव्हाण, मनसुख झांबड यांनी सचखंड गाडीचे आरक्षण 25 जूनपर्यंत पूर्ण असल्याचे तेव्हा त्यांच्या निदर्शनास आणून दिले. दिल्लीला जाणा-या औरंगाबादच्या प्रवाशांसाठी दुसरी गाडी नाही. 10 एप्रिल ते 31 जुलै काळात नांदेड-औरंगाबाद-मनमाड-खांडवा, दिल्ली-अमृतसर-जम्मू तावी (कटरा) गाडी सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर बन्सल यांनी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. एस. सोईन यांना आदेश दिले. प्रत्यक्षात 21 रोजी अकोलामार्गे ही गाडी सोडण्याचा निर्णय सोईन यांनी घेतला. यावर दमरेचे महाव्यवस्थापक ए. जी. पांडे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे वर्मा यांनी सांगितले.