आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होलिक्रॉस पालक कृती समितीचे सोमवारी उपोषण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीने होलिक्रॉस इंग्रजी प्राथमिक शाळेची मान्यता रद्द केल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी पालक कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
शाळा पालक समितीच्या वतीने शिक्षणाधिकारी पी. बी. चव्हाण आणि विस्तार अधिकारी सुनील साबळे यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले. शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा. चालू शैक्षणिक वर्षात मुलांचे होणारे नुकसान टाळा, चुकीच्या पद्धतीने शाळेची मान्यता काढणार्‍या अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. तीन दिवसांपूर्वी शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. अद्याप मुलांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नसून ती पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाने परवानगी द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यासंदर्भात 16 जुलै रोजी विभागीय आयुक्तालयावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला. आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. शिष्टमंडळात राजेंद्र देशमुख, सुनील डोणगावकर, पीटर पाटोळे, आशिया बेगम अब्दुल मलिक, प्रकाश पैठणे, सचिन कोतकर, सचिन कांबळे, अशोक पाटील, प्रा. प्रशांत होर्शिळ यांचा समावेश होता.