आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर खरेदीसंबंधीच्या सुविधा एका छताखाली उपलब्ध, ड्रीमहोमला उत्स्फूर्त प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मूळ औरंगाबादकर असलेले, नव्याने येथे आलेले आणि येथे येण्याकरिता उत्सुक अशा वेगवेगळ्या गटांतील नागरिकांसाठी क्रेडाईचे ड्रीम होम प्रदर्शन एक संधी आहे. रविवारी समारोप होणाऱ्या प्रदर्शनात दोनशेवर घरांची नोंदणी करण्यात आली आहे. विविध राष्ट्रीयीकृत आणि खासगी बंॅकांचे स्टॉल घर घेणाऱ्यांसाठी येथे उपलब्ध आहे. विविध बांधकाम साहित्यांचे स्टॉलही प्रदर्शनात लावण्यात आलेले आहेत.
मराठवाड्याची राजधानी, राज्याची पर्यटन राजधानी, स्मार्ट सिटी, डीएमआयसी यांसह गुणवत्तापूर्ण आधुनिक शिक्षणनगरी, आरोग्याच्या परिपूर्ण सुविधा अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे मराठवाडाच नाही तर संपूर्ण राज्यभरातून औरंगाबादमध्ये आपले घर असावे अशी अनेकांची इच्छा असते. जागा घर खरेदी करण्याकडे आैरंगाबाद शहरात चाकरमान्यांसह व्यावसायिक, व्यापारी, मध्यमवर्गीय, कामगार अशा सर्वांचा कल आहे.

जालना रस्त्यावरील आकाशवाणी चौकात जुन्या बिग बझार मॉलच्या जागेत सुरू असलेल्या या गृह प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मराठवाड्यातून नागरिक येत आहेत. औरंगाबादचा विकास हा आता सर्व दिशांनी होत असून त्यातही सर्व उत्पन्न गटांना नजरेसमोर ठेवून प्रकल्प आकाराला आले आहेत. आज घडीला बीड बायपास, नक्षत्रवाडी, पैठण रोड, वाळूज, माळीवाडा, जटवाडा, नाशिक रोड, पडेगाव, हर्सूल सावंगी, सुंदरवाडी, चिकलठाणा, शेंद्रा, कुंभेफळ अशा सर्व दिशांनी शहराचा मोठ्या झपाट्याने विकास सुरू आहे. आपल्या आवडीनुसार, गरजेनुसार नागरिक या प्रदर्शनातून घर खरेदीकरिता उत्सुक आहेत.

वन रूम किचन, टू रूम किचन अशी त्यांची मागणी असून १० लाख ते ३० लाखांदरम्यानच्या किमतीच्या फ्लॅटची चाचपणी इच्छुक करीत आहेत. याशिवाय आलिशान बंगले, रोहाऊस यासाठीही चौकशी केली जात आहे. या प्रदशर्नाला भेट देणाऱ्यांमधील पाच भाग्यवंताना बक्षिसे, नोंदणी करणाऱ्यांमधील भाग्यवंताला एकवीस हजारांचे सवलत कुपन, व्यावसायिकांच्या वतीने विशेष सवलती, प्रत्यक्ष बांधकाम स्थळी भेट अशा अनेक सुविधा दिल्या जात आहेत.

प्रदर्शन यशस्वी करण्याकरिता क्रेडाईचे अध्यक्ष सुनील पाटील, सचिव विकास चौधरी, क्रेडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा, क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रमोद खैरनार, प्रदर्शन आयोजन समितीचे प्रमुख नरेंद्रसिंग जबिंदा, क्रेडाईचे माजी अध्यक्ष पापालाल गोयल, संग्राम पटारे, आशुतोष नावंदर, बाळकृष्ण भाकरे, नितीन बगडिया, विजय शक्करवार, भास्कर चौधरी, रवी वटटमवार, अनिल अग्रहारकर, सुनील बेदमुथा, सचिन बोहरा, अनिल मुनोत, रामेश्वर भारुका, देवानंद कोटगिरे, अखिल खन्ना आदींसह सर्व कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील आहेत.

बिग बाजार आकाशवाणी चौकात क्रेडाई आयोजित ड्रीम होम प्रदर्शनास भेट देणाऱ्या भाग्यवान नागरिकास भेटवस्तू देताना नरेंद्रसिंग जबिंदा, क्रेडाई आैरंगाबादचे अध्यक्ष सुनील पाटील, सचिव विकास चौधरी , माजी अध्यक्ष पापालाल गोयल आदी. छाया : दिव्य मराठी.
घर घेताना खबरदारी आवश्यक : अॅड. नेहेरी

याप्रदर्शनाच्या निमित्ताने घर खरेदी करताना कोणत्या कायदेशीर बाबी काटेकोरपणे तपासल्या पाहिजेत, कशा तपासल्या पाहिजेत यावर विधिज्ञ एस. आर. नेहेरी यांचे व्याख्यान गुरुवारी रात्री झाले. रियल इस्टेट म्हणजे काय, मालमत्ता खरेदी करताना टायटल कसे तपासावे, फसवणूक कशी टाळता येऊ शकते अशा अनेक बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. उपस्थित नागरिकांच्या शंकांचे त्यांनी निरसन केले.