आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉर्टसर्किटमुळे घराला आग; नोटा जळून खाक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळालेल्या नाेटा पाहून सागरबाई राठोड यांना अश्रू अनावर झाले. - Divya Marathi
जळालेल्या नाेटा पाहून सागरबाई राठोड यांना अश्रू अनावर झाले.
जळगाव- हरिविठ्ठल नगरातशॉर्टसर्किटमुळे घरात आग लागून हजार रुपये रोख संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११.१५ वाजता वाजता घडली.
संजय सपके यांच्या घरात मध्य प्रदेशातून कामासाठी आलेले मिस्त्रीलाल राठोड हे कुटुंबीयांसमवेत भाड्याने राहतात. सकाळी वाजता राठोड पती-पत्नी कामावर निघून गेल्यानंतर सकाळी ११.१५ वाजता शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागली.

शेजारी राहणाऱ्या संजय सोनवणे यांच्या आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाल्याने आग अाटोक्यात आली. तर एका बंबावरील सिडी झाडाच्या फांदीला अडकल्याने नुकसान झाले. तसेच आगीमध्ये महिला सागरबाई मिस्त्रीलाल राठोड यांनी घरात ठेवलेल्या १० १०० रुपयांच्या एकूण हजार रुपयांच्या नोटा, धान्य, कपडे, भांडे इतर वस्तूंचे नुकसान झाले असून भरपाई मिळावी अशी मागणी राठाेड कुटुंबीयांनी केली अाहे
बातम्या आणखी आहेत...