आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री शुभांगी अत्रेच्या हस्ते एक तोळे सोने; नम्रता कोचर ‘होम मिनिस्टर’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- श्री जागृत हनुमान गणेश मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत शहरातील नम्रता कोचर यांनी बाजी मारली. छोट्या पडद्यावरील बहुचर्चित अभिनेत्री शुभांगी अत्रेच्या हस्ते (चिडिया घर मालिकेतील कोयल) एक तोळे सोन्याचे पारितोषिक देऊन कोचर यांचा गौरव करण्यात आला. स्पर्धेत स्वाती बोथरा द्वितीय, तर छाया पटेल या तृतीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.

शेवटच्या फेरीमध्ये कोचर आणि बेाथरा दोघींनाही एक मिनिटात सभागृहातील महिलांकडून अधिकाधिक सेफ्टी पिन्स जमा करून आणण्याचे आव्हान होते. बोथरा यांनी 46 पिन्स जमा केल्या, तर कोचर यांनी 49 पिन्स जमा केल्या. बक्षीस वितरणप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील, राजेश व्यास, जैनमच्या भारती बागरेचा आणि सतीश व्यास यांची उपस्थिती होती. आरजे प्रणिता हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या वेळी मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या.