आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपडपट्टी पुनर्विकासच्या बाबतीत नगरसेवकांना राजकारणाची शंका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादेत झोपडपट्टी पुनर्विकास कार्यक्रम राबवण्याची त्यातून झोपडीधारकांना पक्की घरे देण्याची योजना पालकमंत्र्यांनी जाहीर केली असली, तरी या भागांतील नगरसेवकांना हे निवडणुकीसाठी दिलेले गाजरच वाटत आहे. त्यामुळे आधी योजनेचा थेट प्रारंभ झाला, तरच आमचा विश्वास बसेल, असे ते म्हणाले.
शुक्रवारी पालकमंत्री रामदास कदम औरंगाबाद दौऱ्यावर आले असताना त्यांनी ही घोषणा केली. औरंगाबादेत आता महापालिका निवडणुकीचे पडघम वाजत असताना केलेल्या या घोषणेचे स्वागत करताना झोपडपट्टी वसाहतींच्या भागांतील नगरसेवकांनी साशंकताही व्यक्त केली. शहरात ५२ वसाहती झोपडपट्ट्या असून त्यात साडेतीन लाख रहिवासी राहतात. त्यांना चांगले घर, ड्रेनेज, पाणी, गार्डन इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शहरात झोपडपट्टी पुनर्वसन कार्यक्रम राबवणार आहे.
तसेच येणाऱ्या २० फेब्रुवारीच्या मनपा सर्वसाधारण सभेत हा ठराव घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे शहराचा पूर्ण विकास होणार असून हा कार्यक्रम राबवलाच पाहिजे, असे मत नगरसेवकांनी "दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केले.

डीपी रस्ते मोकळे होतील

^या योजनेमुळे गरिबांना उत्तम घरकुल मिळणार असून डीपी रस्ते मोकळे होऊ शकतात. त्यामुळे रस्त्यांचा त्या भागाचा सर्वांगाने विकास होईल. विकासजैन, नगरसेवक, वेदांतनगर
असे उपक्रम राबवलेच पाहिजेत

^विकासाचेनवीन उपक्रम शिवसेनाच राबवू शकते, असे उपक्रमही राबवलेच पाहिजेत. त्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो. मनीषदहिहंडे, नगरसेवक, नारेगाव

निवडणुकांच्या तोंडावर गाजर नको

^निवडणुकांच्यातोंडावर गाजर दाखवू नये, निवडणुकांपूर्वी कामाला प्रारंभ केला तरच जनता त्यांना स्वीकारेल. योजना चांगली आहे. कैलासगायकवाड, नगरसेवक, बायजीपुरा

दलित वस्तीचाही विकास करावा

^झोपडपट्टीतआणि दलित वस्तीमध्येही गरीबच राहतात. त्यामुळे झोपडपट्टीसह दलित वस्तीचा विकास करावा. त्यामुळे सर्वच गरिबांना फायदा होईल. ज्योतीवाघमारे, नगरसेविका, एकतानगर

अंमलबजावणीत कसलाही संशय नाही

^उद्धवठाकरे यांचा निर्णय कदम यांनी शहरात पोहोचवला आहे. त्याचे स्वागतच आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणीही कदम करतील यात संशय नाही. संगीताअहिरे, नगरसेविका, रोजाबाग

^ही योजना चांगली असल्याने यापूर्वीच राबवण्याचे सांगितले होते. ज्यांच्याकडून विकास होईल, आम्ही त्यांच्यासोबत कायम आहोत. डॉ.जफर खान, नगरसेवक, संजयनगर

^या योजनेची अंमलबजावणी शहरात झालीच पाहिजे. त्यामुळे गावाचा चांगला विकास होईल. नागरिकांना हक्काचे चांगले घर मिळेल. बन्सीजाधव, नगरसेवक, हर्सूल