आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Homes Get Costlier: Govt To Hike Ready Reckoner Rates

रेडीरेकनरच्या दरवाढीच्या शक्यतेने नोंदणीसाठी गर्दी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - येत्या 1 जानेवारीपासून रेडीरेकनरच्या दरात किमान 40 टक्क्यांपासून ते चौपट वाढ होणार असल्याचे जाहीर झाल्याने तेवढय़ाच प्रमाणात मुद्रांक शुल्क वाढणार आहे. त्याआधीच रजिस्ट्री करण्यावर व्यवहार करणार्‍यांचा कल असून गेल्या गुरुवारपासून रजिस्ट्री कार्यालयात गर्दी वाढली आहे.

दरवर्षी 1 जानेवारीपासून रेडीरेकनर म्हणजेच जमिनीच्या शासकीय दरात वाढ होते. आतापर्यंत हे प्रमाण दरवर्षी 10 ते 20 टक्क्यांच्या आसपास राहते. यंदा मात्र हे दर किमान 40 टक्के, तर काही ठिकाणी चौपट वाढणार असल्याचे सूतोवाच सूत्रांनी केले. शहरालगतच्या 12 खेड्यांमध्ये चौपट दर वाढणार असल्याचे स्पष्ट झाल्याने या भागातील नागरिकांनी 31 जानेवारीपूर्वीच व्यवहार पूर्ण करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे गुरुवारी तहसील कार्यालयाला लागून असलेल्या रजिस्ट्री कार्यालयात प्रचंड गर्दी होती. 1 जानेवारीपूर्वी फक्त तीनच दिवस शासकीय कामकाज होणार असल्यामुळे शुक्रवार, सोमवार आणि मंगळवार या दिवशी जास्तीत जास्त व्यवहार होण्याची शक्यता आहे. गुरुवारी मात्र कार्यालयात गर्दी वाढली होती.

जानेवारीचा पहिला व्यवहार नव्या दरानेच होणार
1 जानेवारीला सकाळी नवीन दराची प्रत प्राप्त झाल्याशिवाय कोणताही व्यवहार होणार नाही. जो काही पहिला व्यवहार होईल, तो नवीन रेडीरेकनरनुसारच हे ठरलेले आहे. त्यामुळे 31 डिसेंबरला जास्त व्यवहार होण्याची शक्यता आहे.